किर्ती कुल्हारीने पोस्ट शेअर करत केली ही घोषणा, पतीपासून होतेय वेगळी

बी टाऊन
Updated Apr 01, 2021 | 16:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

किर्ती  आणि साहिल यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले होते. आता या अभिनेत्रीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. 

kirti kulhari
किर्ती कुल्हारीने पोस्ट शेअर करत केली ही घोषणा, 

थोडं पण कामाचं

  • किर्तीने २०१६मध्ये साहिल सेहगलश लग्न केले होते.
  • अभिनत्री किर्ती कुल्हारीने आपला पती साहिलपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
  • किर्तीच्या या निर्णयाने साऱ्याच चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.

मुंबई: अभिनेत्री किर्ती कुल्हारीच्या (Kirti Kulhari) चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे. अभिनत्री किर्ती कुल्हारीने आपला पती साहिलपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना म्हटले की ती पती साहिलपासून वेगळी होत आहे. किर्तीच्या या निर्णयाने साऱ्याच चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.

किर्तीने २०१६मध्ये साहिल सेहगलश लग्न केले होते. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करताना दिसत होे. मात्र आता किर्तीने आपल्या पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. किर्तीने असा निर्णय का घेतला यामुळे चाहते चांगलेच हैराण झाले आहेत. 

सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

किर्तीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, मी सगळ्यांना ही माहिती देऊ इच्छिते की मी आणि माझे पती साहिल यांनी वेगळे होण्याचा विचार केला आहे. आम्ही केवळ कागदांपुरते नव्हे तर आयुष्यात आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्यासोबत असण्यापेक्षा त्या व्यक्तीपासून दूर होण्याचा निर्णय हा सगळ्यात कठीण असतो. अभिनेत्रीने पुढे लिहिले की, आता याला बदलले जाऊ शकत नाही. अशातच ज्यांना माझी काळजी आहे त्यांच्यासाठी मी ठक आहे. यानंतर मी कोणतेही विधानकरणार नाही. अशा पद्धतीने किर्तीने आपल्या भावना लपवण्याचा प्रयत्न केला. 

रिलेशनशिपमध्ये होते किर्ती आणि साहिल

किर्ती आणि साहिल जेव्हा एकाच ठिकाणी काम करत असताना त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. दोघेही एका जाहिरातीत एकत्र काम करत होते. इथूनच त्यांच्या प्रेमाला सुरूवात झजाली. दोघांनी खूप वेळ एकमेकांना डेट केले नाही तर दोन महिने डेट केल्यानतर किर्तीने साहिलला लग्नसाठी प्रपोज केले आणि अखेर २०१६मध्ये दोघांनी लग्नही केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी