kisi ka bhai kisi ki jaan: बॉलिवूडचा भाईजान अर्थात सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकादा एक्शनमोडमध्ये दिसणार आहे. कारणही तसंच आहे. सलमानचा नवा चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'चा ट्रेलर अखेर आज, 10 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता रिलीज होणार आहे. सलमानच्या न्यू मुव्हीबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसत आहे. 'किसी का भाई किसी की जान'चा ट्रेलर रिलीज होताच तो सोशल मीडियावर व्हायरल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
'किसी का भाई किसी की जान'चं खास वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगळे दिसणार आहे. 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट रमझान ईदच्या शुभ मुहुर्तावर म्हणजेच 21 एप्रिल 2023 ला रिलीज होणार आहे. चित्रपट रिलीज होण्याआधीत त्याचे सॉग्ज चाहत्यांनी डोक्यावर उचलून धरले आहेत. चित्रपटाच्या गाण्यांना तुफान प्रतिसाद मिळतोय. याआधी 25 जानेवारीला 'किसी का भाई किसी की जान'चा टीझर रिलीज झाला होता. चाहत्यांकडून टीझरला देखील भरभरून प्रतिसाद दिला होता. आता ट्रेलरला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
#KisiKaBhaiKisiKiJaan trailer out at 6pm @hegdepooja @VenkyMama @farhad_samji @IamJagguBhai @bhumikachawlat @boxervijender #AbhimanyuSingh @TheRaghav_Juyal @jassiegill @siddnigam_off @ishehnaaz_gill @palaktiwarii @vinalibhatnaga1 pic.twitter.com/FrVxrg7z6I — Salman Khan (@BeingSalmanKhan) April 10, 2023
सलमान खानचा 'तेरे नाम' या चित्रपटातील 'राधे'ची भूमिका लक्षवेधी ठरली होती. त्यानंतर आता सलमान खान पुन्हा एकदा आगळ्या- वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. लांब केसांत सलमान खान दिसणार आहे. सलमान खानच्या न्यू मुव्हीचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. त्यात पूजा हेगळे आणि सलमान खान एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात पूर्ण स्टार कास्ट साउथ इंडियन लूकमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. तसेच सलमान खान लांब केसांत दिसतो आहे. 'लव्ह यू भाई' असं संबोधून चाहत्यांनी आपल्या आवडत्या भाईजानवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
'किसी का भाई किसी की जान'मध्ये पूजा हेगडे आणि सलमान खान ही जोडी पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या जोडीची कमाल पाहाण्यासाठी चाहते आतापासून उत्सूक झाले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर 10 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता रिलीज होणार आहे. दरम्यान, 'किसी का भाई किसी की जान'चे आतापर्यंत 5 गाणे रिलीज झाले आहेत. त्यात 'नाइयो लगदा', 'जी रहे थे हम', 'बिल्ली बिल्ली' आणि 'येंतम्मा' या गाण्यांचा समावेश आहे. या चित्रपटात पूजा हेगळेसोबत साउथ स्टार व्यंकटेश, भूमिका चावला, शहनाज गिल, पलक तिवारी सारखे दिग्गज दिसणार आहेत.
'किसी का भाई किसी की जान'मुळे सलमान खान ट्रेंडिंगमध्ये आहे. अशातच सलमान खानची लेटेस्ट पोस्ट इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. त्यात डिजिटल क्रिएटर कामाकाझी (kamakazi) अत्यंत फनी अंदाजात लुंगी डान्स करताना दिसत आहे. जेव्हा आम्ही लहान होतो, तेव्हापासून आम्ही यांना अशाच अवतारात पाहात आलो आबे. ते काय करत आहे, याबाबत आम्ही काहीच वाटत नाही. परंतु त्यांनी प्रत्येकाला खळखळून हसवलं आहे. मला विश्वास आहे की, आज तुम्हालाही खळखळून हसायला मिळणार आहे. #KisiKaBhaiKisiJaan #KBKJ चा ट्रेलर या टॅगसह सलमान खानने फनी व्हिडीओ शेअर केला आहे. आपला भाई आणि आपल्या जानसह पाहा 'किसी का भाई किसी की जान' असं आवाहन देखील सलमान खानने केलं आहे.