KL Rahul And Athiya Shetty: के.एल राहुल आणि अथिया शेट्टीला मिळाले घर; लग्नानंतर बनणार रणबीर आलियाचे शेजारी 

बी टाऊन
Updated Apr 30, 2022 | 13:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

KL Rahul Wife | बॉलिवूड आणि क्रिकेटचे नाते आता सामान्य आहे. असे अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांनी बॉलिवूड अभिनेत्रींना जीवनसाथी बनवले आहे. आता या यादीत आणखी एका नावाचा समावेश होण्याची शक्यता आहे.

kl rahul and athiya shetty's get home near by alia bhatt and ranbir kapoor's home
के.एल राहुल आणि अथिया शेट्टी होणार रणबीर आलियाचे शेजारी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूड आणि क्रिकेटचे नाते आता सामान्य आहे.
  • अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांनी बॉलिवूड अभिनेत्रींना आपली जीवनसाथी बनवली आहे.
  • संधू पॅलेस नावाच्या इमारतीत के.एल राहुल आणि अथिया शेट्टी हे जोडपे कायमस्वरूपी आपले घर बनवत आहेत.

KL Rahul Wife | मुंबई : बॉलिवूड आणि क्रिकेटचे नाते आता सामान्य आहे. असे अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांनी बॉलिवूड अभिनेत्रींना जीवनसाथी बनवले आहे. आता या यादीत आणखी एका नावाचा समावेश होण्याची शक्यता आहे. मागील ३ वर्षांपासून बॉलिवूडमधील स्टार सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू के.एल राहुलला डेट करत आहे. दोघांच्या लग्नाच्या अफवा येत आहेत. पण हे जोडपे २०२२ मध्ये लग्न करणार असल्याची चर्चा आहे. लक्षणीय बाब म्हणडे हे कपल सध्या भाड्याच्या घरामध्ये राहणार आहे आणि योगायोगाने हे घर रणबीर आलियाच्या घरापासून खूप जवळ आहे. (kl rahul and athiya shetty's get home near by alia bhatt and ranbir kapoor's home). 

अधिक वाचा : दिल्लीतील गरमीने मोडला ७२ वर्षांचा विक्रम

भाड्याने राहणार राहुल आणि अथिया

याआधी जेव्हा त्यांच्या लग्नाच्या अफवा येत होत्या तेव्हा हे जोडपे वांद्रे येथील कार्टर रोडवर ४ बीएचके बंगला घेणार असल्याचे बोलले जात होते. हा बंगला ते भाड्याने घेणार होते आणि त्याचे भाडे महिन्याला तब्बल १० लाख रूपये होते. मात्र आता त्यांच्या लग्नाबाबतच्या अफवा थंडावल्या असून या वर्षी दोघेही लग्न करतील अशी अपेक्षा नाही. आता नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, हे जोडपे मुंबईतील पाली हिल येथील एका मोठ्या इमारतीत संपूर्ण ९ वा मजला घेत आहेत. याचे इंटीरियर सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टी स्वतः डिझाइन करणार आहे. माना एक सुप्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे याची सर्वांनाच कल्पना आहे.

संधू पॅलेस नावाच्या इमारतीत हे जोडपे कायमस्वरूपी आपले घर बनवत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे जेव्हा हे जोडपे लग्नबंधनात अडकेल तेव्हा ते या ठिकाणी शिफ्ट होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र इमारतीचे अद्याप बांधकाम पूर्ण झालेले नाही. विशेष बाब म्हणजे या इमारतीच्या दोन इमारतींसमोर रणबीर-कपूर आणि आलिया भट्ट यांचे घर आहे. म्हणजे के.एल राहुल आणि अथिया शेट्टी आता रणबीर-आलियाचे शेजारी बनणार आहेत. 

के. एल राहुलने या IPL मध्ये २ शतके झळकावली आहेत

के.एल राहुलच्या खेळीबद्दल भाष्य करायचे झाले तर, के.एल राहुलने शानदार खेळीच्या जोरावर भारतीय संघामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या आयपीएलमध्ये तो चांगल्या फॉर्मनुसार खेळत आहे. त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी देखील त्याला मैदानात चीयर करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी के.एल राहुलचा सामना पाहण्यासाठी त्याचे सासरे सुनील शेट्टीही उपस्थित होते, मात्र त्या सामन्यात के.एल राहुल शून्यावर बाद झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी