KL Rahul Athiya Shetty Wedding : केएल राहुल आणि अथिया शेट्टीने बांधली लगीनगाठ, खंडाळ्यात पार पडला विवाहसोहळा

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jan 24, 2023 | 13:21 IST

अथिया (Athiya Shetty) -राहुल (KL Rahul) गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. 2019 साली एका मित्राच्या पार्टीत केएल राहुलने अथियाला पाहिलं होतं. त्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. शेवटी त्यांनी आज लगीनगाठ (married) बांधली. 

KL Rahul Athiya Shetty Wedding
केएल राहुल अथिया शेट्टीचे लग्न  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने त्यांनी लग्न केलं आहे.
  • आज साडेचार वाजता अथिया व केएल राहुलचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.
  • अथिया-राहुल गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

KL Rahul Athiya Shetty Wedding : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी(Athiya Shetty) आणि क्रिकेटपटू केएल राहुल(KL Rahul) यांच्या लग्नाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. हे बहुचर्चित कपल आज विवाहबंधनात अडकले आहे.  सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने त्यांनी लग्न केलं आहे. आज साडेचार वाजता अथिया व केएल राहुलचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.  (KL Rahul Athiya Wedding : KL Rahul and Athiya Shetty tied the knot, married in Khandala)

अधिक वाचा  : राज्यपाल कोश्यारी यांना आता नको जबाबदारीचा भार

अथिया-राहुल गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. 2019 साली एका मित्राच्या पार्टीत केएल राहुलने अथियाला पाहिलं होतं. त्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.  शेवटी त्यांनी आज लगीनगाठ बांधली. 

अधिक वाचा  : कधी आहे माघी गणेश जयंती? माघी गणेश जयंती का साजरी करतात?

फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार!

अथिया आणि केएल राहुल  यांनी फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत सातफेरे घेतले आहेत. यात बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. लग्नानंतर केएल आणि अथियाने मनोरंजन आणि क्रिकेटविश्वातील मंडळींसाठी खास भव्य रिसेप्शनचं आयोजन केलं आहे.  यात रिसेप्शनला अनेक उद्योगपती आणि राजकारणीदेखील उपस्थित राहणार आहेत. विवाहसोहळा संपन्न होताच सुनील शेट्टीने लेकासह प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मिठाई वाटली. यावेळी सुनील शेट्टीच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत होता.

 आयपीएलनंतर ग्रॅंड रिसेप्शन 

लग्न सोहळ्यादरम्यान सुनील शेट्टी म्हणाले,"केएल राहुल हा माझा जावई नसून मुलगाच आहे. मी जरी नात्याने त्याचा सासरा असलो तरी तो माझा मुलगाच आहे. अथिया आणि केएल राहुलचं रिसेप्शन आयपीएलनंतर (IPL) होणार आहे. लग्नानंतर सुनील शेट्टीने मुलगा अहान शेट्टीबरोबर पापाराझींना पोज दिल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी