अबब! इतक्या कोटींचं आहे ‘विरुष्का’चं वार्षिक उत्पन्न, जाणून घ्या कोण अधिक कमावतं

बी टाऊन
Updated Jan 27, 2020 | 15:06 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Virat Kohli and Anushka Sharma net worth: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याच्या वार्षिक उत्पन्नाची आकडेवारी थक्क करणारी आहे. जाणून घ्या कमाईच्या बाबतीत अनुष्का किती मागे आहे ते...

Virushka
अबब! इतक्या कोटींचं आहे ‘विरुष्का’चं वार्षिक उत्पन्न 

थोडं पण कामाचं

  • विराट आणि अनुष्काचं वार्षिक उत्पन्न आश्चर्यकारक
  • विरुष्का देशातील सर्वात श्रीमंत सेलिब्रेटींपैकी एक
  • क्रिकेट, बॉलिवूड सोबतच अनेक ब्रांड्समुळे होते कमाई

मुंबई: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा क्रिकेट सोबतच जगातील सर्वाधिक लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. विरुष्का नावानं प्रसिद्ध असलेलं हे कपल कमाईच्या बाबतीतही खूप अग्रेसर आहे. क्रिकेट आणि बॉलिवूडमध्ये कोहली आणि अनुष्काचं नाव खूप सन्माननिय लोकांमध्ये घेतलं जातं. जिथं विराट कोहली वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये अव्वल रँक असलेला खेळाडू आहे आणि जगातिल सर्वश्रेष्ठ बॅट्समनपैकी एक आहे. तर दुसरीकडे अनुष्का बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री आहे.

एव्हढंच नव्हे तर विराट आणि अनुष्का देशातील सर्वात श्रीमंत सेलिब्रेटींपैकी एक आहे. विराटनं नुकतंच २०१९ च्या फोर्ब्स सेलिब्रेटिजच्या १०० जणांच्या यादीत पहिलं स्थान मिळवलंय तर अनुष्का शर्मा २१व्या स्थानावर आहे. दोघंही आपआपल्या क्षेत्रात यशाचे नवनवीन शिखरं गाठत आहेत. जीक्यू इंडियानं नुकताच खुलासा केलाय की, विरुष्काचं वार्षिक उत्पन्न किती आहे आणि त्यांच्या कमाईचे माध्यमं कोणकोणते आहेत.

विराट आणि अनुष्काचं वार्षिक उत्पन्न

रिपोर्टनुसार विराट कोहलीनं गेल्यावर्षी २५२.७२ कोटी रुपयांची कमाई केली. टीम इंडियाचा प्रमुख बॅट्समन आणि कॅप्टन असलेल्या विराटची एकूण संपत्ती ९०० कोटी रुपये असल्याचं कळतंय. तर अनुष्का शर्मानं गेल्यावर्षी २८.६७ कोटी रुपये कमावले. तिची एकूण संपत्ती ३५० कोटी रुपये इतकी आहे. कोहली आणि अनुष्का यांची एकूण संपत्ती १२०० कोटींहून अधिक आहे.

विराटची कमाई

कमाईच्या माध्यमांबाबत बोलायचं झालं तर कोहलीच्या कमाईचा सर्वात मोठा भाग हा एंडोर्समेंटमधील आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं विराटला १७ कोटी रुपयांना रिटेन केलं होतं. यामुळे तो आयपीएलमधील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला. तर बीसीसीआयनं त्याला वार्षिक ७ कोटींच्या करारामध्ये बांधलेलं आहे. कोहली एंडोर्समेंटच्या नावावर मिंत्रा, उबर, ऑडी, एमआरएफ, मान्यवर आणि टिसोटसह अनेक ब्रांड्सचा प्रचार करतो. प्यूमासोबतच वन८ नावाचे ब्रांड्सद्वारे १०० कोटींची कमाई कोहलीनं केलीय. तसंच कोहलीचे स्वत:चे दोन रेस्टॉरंट सुद्धा आहेत.

अनुष्काची कमाई

तर दुसरीकडे अनुष्का शर्मा प्रत्येक चित्रपटासाठी फी १२-१५ कोटी रुपये घेते. आतापर्यंत जवळपास १९ चित्रपटांमध्ये तिनं काम केलेत. तिचं एक प्रॉडक्शन हाऊस सुद्धा आहे, जे तिनं २०१४ मध्ये आपल्या भावासोबत लॉन्च केलं. तसंच अनुष्का मान्यवर, मिंत्रा, नीव्हिया, रजनीगंधी, श्याम स्टील, लेवी, कॉक्स अँड किंग्स, पॅँटीन, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, गूगल पिक्सेल आणि इतर ब्रांड्सचा प्रचार करते. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्काचा आपला स्वत:चा फॅशन ब्रांड नुश पण आहे.

विरुष्काचं घर

विरुष्कानं रिअल इस्टेटमध्येही आपलं नशीब आजमावलं आहे. विरुष्कानं खूप महागडं असं घर बनवलंय. २०१७मध्ये लग्नानंतर ते दोघं मुंबईत वरळीमध्ये एका शाही घरात शिफ्ट झाले. त्यांच्या घराची किंमत ३४ कोटी रुपये आहे. तसंच कोहली आणि अनुष्कानं गुरुग्राममध्ये ८० कोटी रुपयांची संपत्ती खरेदी केल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी