आमिर खानकडे आहेत या १० महागड्या कार, १० कोटीच्या कारमधून फिरतो आमिर

बी टाऊन
Updated Feb 12, 2021 | 16:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटल्या जाणाऱ्या आमिर खानकडे अनेक महागड्या कार आहेत.त्याच्याकडे १० कोटी रूपयांचीही कार आहे. जाणून घ्या त्याच्याकडे असलेल्या कार कलेक्शनबद्दल

aamir khan
आमिर खानकडे आहेत या १० महागड्या कार 

थोडं पण कामाचं

  • आमिर खानकडे महागड्या कार आहेत
  • १० कोटी रूपयांच्या कारमधून फिरतो आमिर
  • जाणून घ्या आमिर खानकडे कोणकोणत्या कार आहेत

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आमिर खान(Bollywood actor aamir khan) आपल्या जबरदस्त अभिनय आणि दर्जेदार सिनेमांसाठी ओळखला जातो. त्याला बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट(mr.perfectionist) असे म्हटले जाते. आमिरने १९९८मध्ये कयामत से कयामत तक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात तो जुही चावलासोबत दिसला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्याने इंडस्ट्रीमध्ये आपली जागा कायम राखली आहे. 

आमिरच्या पर्सनल लाईफबाबत बोलायचे झाल्यास त्याला कारची खूप आवड आहे. त्याच्याकडे एकापेक्षा एक महाग कारचे कलेक्शन आहे. जे जाणून तुम्हीच हैराण व्हाल. त्याच्याकडे अशाही गाड्या आहेत ज्या भारतात फारच कमी लोकांकडे आहेत. 

Mercedes-Benz Maybach S600

आमिरकडे Mercedes-Benz Maybach S600कार आहे. माहितीनुसार ही कार खरेदी करणारा तो तिसरा भारतीय आहे. ही कार इतकी खास आहे की एके४७ अथवा सुरुंगाचाही यावर परिणाम होत नाही. या कारमध्ये मजबूत दरवाजे तसेच काचांसह फायर आणि सिक्युरिटी अलार्म सिस्टीमही आहे. या कारची किंमत १० कोटी रूपये इतकी आहे. 

रोल्स रॉयस घोस्ट

आमिर खानची जी दुसरी कार रोल्स रॉयस घोस्ट आहे. ही कारही देशातील लक्झरी कारपैकी एक आहे. याची किंमत ५.२५ कोटी ते ६.३८ कोटी रूपये इतकी आहे. 

बेंटले कॉन्टिनेंटल फ्लाइंग स्पर

आमिर खानजवळ बेंटले कॉन्टिनेंटल फ्लाइंग स्पर कार आहे ज्याचा नंबर ०००७ असा आहे. या कारची किंमत ३.२१-३.४१ कोटी रूपये आहे.या कारचा स्पीड प्रति तास ३००किमी इतका आहे.

BMW 6- सीरीज जीटी

आमिर खानकडे BMW 6- सीरीज जीटी कार आहे. ही कार ५.४ सेकंदात १०० किमीत प्रतितासाचा वेग पकडते. कारची सुरूवातीची किंमत ६५ लाख रूपये आहे. 

रेंज रोवर वोग

आमिर खानकडे रेंज रोव्हर वोग कार आहे ज्यातील फीचर या कारला इतर कारच्या तुलनेत वेगळे ठरवतात. यात ५०० सीसी इंजीन आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी