तुम्ही आई बनत आहात का? अनुष्काचा हा ड्रेस नक्कीच आवडेल आणि किंमतही परवडण्यासारखी

बी टाऊन
Updated Nov 26, 2020 | 13:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

anushka sharma: अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लवकरच आई-बाबा होणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी ही गुडन्यूज साऱ्यांना दिली. 

anushka sharma
अनुष्काच्या या ड्रेसची किंमत तुम्हाला माहीत आहे का? 

थोडं पण कामाचं

  • अनुष्का आणि विराटचे हे पहिले बाळ असणार आहे
  • अनुष्का प्रेग्नंसीमध्येही एकदम स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे
  • तुम्हालाही जर हा अनुष्काचा रेड ड्रेस विकत घ्यायचा असेल तर त्यासाठी केवळ २,१०० रूपये खर्च करावे लागतील

मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली(team india captain virat kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा(actress anushka sharma) आपल्या पहिल्या बाळाच्या(baby) स्वागताची तयारी करत आहे. दरम्यान, असे असले तरी प्रेग्नंसी लूकमध्येही(pregnancy loook) अनुष्का खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसत आहे. ही अभिनेत्री सध्या रूपेरी पडद्यापासून जरी दूर असली तरी लाईमलाईटपासून दूर नाही आहे. जानेवारी २०२१मध्ये विराट आणि अनुष्काचे बाळ येणार आहे. दरम्यान, मुंबईमध्ये ही अभिनेत्री शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आयपीएलदरम्यान ती विराटसोबत दुबईमध्ये होती. त्यानंतर ती भारतात परतली असून मुंबईत सिनेमांसाठी ती शूटिंग करत आहे. 

आयपीएलदरम्यान यूएईमध्ये असताना अनुष्का शर्मा नेहमीच आपला नवरा विराट कोहलीला चीअरअप करताना दिसत असते. यावेळचे तिचे सर्व फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल झाले आहेत. या दरम्यान ती एका सामन्यासाठी लाल रंगाचा मिनी ड्रेस त्यासोबत नॉट असलेले स्लीव्हस घातले होते. यावेळी तिने सिंपल मेकअप केला होता. तिने गोल्ड रिंग्स एअररिंग घातले होते आणि आपले केस मिडल पार्टिंगसोबत मोकळे ठेवले होते. 

अनुष्काचा हा लाल रंगाचा ड्रेस पाहून तुम्हालाही वाटलं असेल ना की आपणही प्रेग्नंसीदरम्यान हा ड्रेस घ्यावा. मात्र तुम्ही विचार कराल की याची किंमत खूप महाग असेल. पण तसे काही नाही आहे. अनुष्काचा हा ड्रेस तुमच्या खिशालाही परवडण्यासारखा आहे. 

ASOS या वेबसाईटवर हा ड्रेस आहे. याची किंमत वेबसाईटवर £32.00(म्हणजेच साधारण ३,१६४ रूपये) इतकी दिली आहे. मात्र डिस्काऊंटसोबत हा ड्रेस £21.60(साधारणपणे २.१३५ रूपये) इतक्या रूपयांना अव्हेलेबल आहे. 

आपल्या मॅटर्निटी कालावधीदरम्यानही अनुष्का आपल्या फॅशनमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिचा लूक हा नेहमीच स्टायलिश पाहायला मिळत आहे. यासोबतच तिच्या चेहऱ्यावरील प्रेग्नंसी ग्लोही वाढतच आहे. 

कामाबाबत बोलायचे झाल्यास अनुष्का शेवटची शाहरूख खानच्या झिरो या सिनेमात दिसली होती. यात कतरिना कैफचीही भूमिका होती. दरम्यान, बऱ्याच प्रमोशननंतरही झिरो हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला. दरम्यान, अनुष्काकडून पुढच्या प्रोजेक्टची घोषणा झालेली नाही. दरम्यान, ती भारताची महिला क्रिकेट झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये दिसणार असल्याचे सांगितल जात होते. 

तसेच असेही सांगितले जात होते की ती प्रभास आणि सैफ अली खानच्या आदिपुरूष मध्ये दिसू शकते. मात्र सूत्रांनी हे रिपोर्ट फेटाळून लावले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी