Forrest Gump story: आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा आहे 'या' सिनेमाचा रिमेक, जाणून घ्या नेमकी कथा

बी टाऊन
रोहित गोळे
Updated Aug 08, 2022 | 20:46 IST

Forrest Gump story Remake: आमिर खानचा चित्रपट लाल सिंग चड्ढा हा हॉलीवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचा रिमेक आहे. जर तुम्ही चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या चित्रपटाची कथा काय असू शकते...

know what is story of aamir khans laal singh chaddha hindi remake movie which is a of forrest gump
आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'ची जाणून घ्या नेमकी कथा 
थोडं पण कामाचं
  • आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.
  • लाल सिंग चड्ढा हा हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक आहे.
  • फॉरेस्ट गंपला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह अनेक ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत.

Forrest Gump Story: आमिर खानचा चित्रपट लाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha) 11 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. लाल सिंग चड्ढा हा 1994 साली प्रदर्शित झालेल्या हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचा (Forrest Gump) रिमेक असणार आहे. फॉरेस्ट गंपमध्ये टॉम हँक्स (Tom Hanks)हा मुख्य भूमिकेत होता. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता अशा अनेक श्रेणींमध्ये या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. लाल सिंग चड्ढाच्या ट्रेलरमधील अनेक दृश्ये ही तशीच्या तशी फॉरेस्ट गंपमधून घेण्यात आली आहेत. (know what is story of aamir khans laal singh chaddha hindi remake movie which is a of forrest gump)

फॉरेस्ट गंप ही एका कमी हुशार माणसाची कथा आहे जो अतिशय निष्पाप आणि साफ मनाचा आहे. अमेरिकेच्या इतिहासातील अनेक संकटे आणि अनेक घटनांनी त्यांचे जीवन प्रभावित झाले होते.

अधिक वाचा: Kareena Kapoor Khan: Laal Singh Chaddha साठी आमिरनं घेतलेल्या मेहनतीचं करिनाकडून कौतुक

चित्रपटाच्या सुरुवातीला अमेरिकेतील अल्बामा येथे राहणारा फॉरेस्ट गंप (टॉम हँक्स) बस स्टॉपवर बसची वाट पाहत आहे. याचवेळी शेजारी बसलेल्या लोकांना तो त्याच्या आयुष्याची कहाणी सांगत असतो. लहानपणी फॉरेस्टला मणक्याचा त्रास होता. यामुळे त्याला चालता येत नव्हते. फॉरेस्टचा आयक्यू लेव्हलही खूप कमी होता, त्यामुळे त्याला शाळेत प्रवेश मिळत नव्हता. फॉरेस्टची आई त्याला प्रोत्साहन द्यायची की तो स्पेशल चाइल्ड आहे. कसेबसे त्याला शाळेत प्रवेश मिळतो. येथे त्याची जेनी नावाच्या मुलीशी मैत्री होते. पण फॉरेस्टला काही मुलं त्रास देतात आणि त्याच्यावर दगडफेक देखील केली जाते.

फुटबॉल संघात सामील होतो फॉरेस्ट

फॉरेस्ट मोठा होत असताना ही मुलं एक दिवस त्याला मारायला येतात. जेनी त्याला जीव वाचवण्यासाठी पळून जाण्यास सांगते आणि तो पळू लागतो. इथेच त्याला समजतं की, आपण जोरात पळू शकतो. त्यानंतर तो काही दिवस तो इतक्या वेगाने धावतो की त्याची निवड कॉलेज फुटबॉल संघात होते.

अधिक वाचा: Laal Singh Chaddha First Review: लाल सिंग चड्ढाचा फर्स्ट रिव्ह्यू, जाणून घ्या आमिर-करीनाचा चित्रपट पाहावा की नाही?

फुटबॉल संघातील अव्वल खेळाडू असल्याने त्याला महाविद्यालयात प्रवेश मिळतो. फॉरेस्ट कॉलेजमधून पास होतो त्यावेळी व्हिएतनाम युद्धासाठी अमेरिकन सैन्यात सैन्य भरती होत असते. फॉरेस्ट आर्मीमध्ये सामील होतो. फॉरेस्टला व्हिएतनाम युद्धासाठी पाठवले जाते. तिथे त्याची बब्बा नावाच्या माणसाशी मैत्री होते, ज्याला कोळंबीचा व्यवसाय करायचा असतो.

फॉरेस्ट गंप युद्धात होतो जखमी 

फॉरेस्ट युद्धात जखमी होतो, परंतु तो त्याच्या साथीदारांना आणि कमांडिंग ऑफिसरला वाचवतो. या दरम्यान बब्बाचा मात्र मृत्यू होतो. त्याच वेळी त्याचा कमांडिंग ऑफिसर अपंग होतो. युद्धानंतर, फॉरेस्टचा अमेरिकेच्या अध्यक्षांकडून सन्मान केला जातो. 

अधिक वाचा: Box Office Prediction: विरोधाच्या पार्श्वभूमीवर'रक्षाबंधन' आणि 'लाल सिंह चड्ढा' रिलीज होणार, कशी असेल कमाई जाणून घ्या

दरम्यान, एका रॅलीमध्ये त्याला त्याची शाळेतील मैत्रीण जेनी भेटते. जी ड्रग्जच्या आहारी गेलेली असते. तर दुसरीकडे फॉरेस्टच्या आईचा याच काळात मृत्यू होतो. यानंतर तो आपल्या अपंग कमांडिंग ऑफिसरसोबत कोळंबीचा व्यवसाय सुरू करतो. एका घटनेमुळे त्याचा व्यवसाय अचानक भरभराटीला येतो आणि तो अब्जाधीश होतो. त्यावेळी फॉरेस्ट त्यातील एक भाग बब्बाच्या कुटुंबाला देतो, ज्यामुळे त्यांचे जीवन बदलून जाते.

IMBD मध्ये 8.8 रेटिंग

फॉरेस्ट जेनीला भेटतो आणि तेव्हा त्याला कळते की जेनी त्याच्या मुलाची आई झाली आहे. तथापि, जेनी त्याला असे काहीतरी सांगते ज्यामुळे तो हेलावून जातो. फॉरेस्ट गंपचा क्लायमॅक्स हा खूपच भावनिक आहे.

अधिक वाचा:  Atul Kulkarni as Laal Singh Chaddha film writter :'लाल सिंग चड्ढा'द्वारे अभिनेता अतुल कुलकर्णीचे लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण

फॉरेस्ट गम्पमध्ये व्हिएतनाम युद्ध, जॉन एफ. केनेडी यांची हत्या, वॉटरगेट घोटाळा यासारख्या अमेरिकन इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांचे चित्रण आहे. या चित्रपटाला IMDB वर 8.8 रेटिंग आहे. आता आमिर खानचा लाल सिंग चड्ढा या क्लासिकला कितपत न्याय देतो हे पाहावे लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी