Koffee With Karan: 'कॉफी विथ करण' शो कायमचा झाला बंद; करणने भावनिक पोस्ट करून दिली माहिती

बी टाऊन
Updated May 04, 2022 | 14:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

Koffee With Karan । बॉलिवूडचे गुपित उघड करणारा 'कॉफी विथ करण' हा बॉलीवूडचा आवडता शो प्रेक्षकांमध्ये चांगलाच गाजला होता. मात्र सहा यशस्वी सिझननंतर हा शो कायमस्वरूपीसाठी बंद झाला आहे.

'Koffee with Karan' show closed forever, Karan posted emotional post
'कॉफी विथ करण' शो कायमचा झाला बंद, करणने केली भावनिक पोस्ट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूडचे गुपित उघड करणारा 'कॉफी विथ करण' शो कायमचा बंद झाला आहे.
  • करण जोहरने भावनिक पोस्ट करून माहिती दिली.
  • १९ नोव्हेंबर २००४ रोजी या शोचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Koffee With Karan । मुंबई : बॉलिवूडचे गुपित उघड करणारा 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) हा बॉलीवूडचा आवडता शो प्रेक्षकांमध्ये चांगलाच गाजला होता. मात्र सहा यशस्वी सिझननंतर हा शो कायमस्वरूपीसाठी बंद झाला आहे. दरम्यान चित्रपट निर्माता आणि शोचा होस्ट करण जोहरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून भावनिक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली. करणने खुलासा केला की, 'कॉफी विथ करण' सातव्या सीझनसह परत येणार नाही. करण जोहरच्या या शोवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने (Kangana Ranaut) घराणेशाहीचा आरोप केला होता तेव्हापासून हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. ('Koffee with Karan' show closed forever, Karan posted emotional post). 


करण जोहरने केली मोठी घोषणा 

करण जोहरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करताना लिहले आहे की, "कॉफी विथ करण' हा माझ्या आणि तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे कारण आम्ही त्याचा ६ वा सीझन पूर्ण केला आहे. आम्ही या शोद्वारे लोकांवर आणि पॉप संस्कृतीवर प्रभाव टाकला आहे. त्यामुळे मला जड अंतःकरणाने जाहीर करायचे आहे की 'कॉफी विथ करण' परत येणार नाही."

अधिक वाचा : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जुलैमध्ये पुन्हा वाढणार एवढा भत्ता

करण जोहरची पोस्ट इथे पाहा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)


ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला करण 

करण जोहरच्या घोषनेनंतर सोशल मीडियावर तो ट्रोलर्संच्या निशाण्यावर आला आहे. याशिवाय काही नेटकरी करणला ट्रोल करताना काही मीम्स शेअर करत आहेत.  

असा आहे प्रवास

१९ नोव्हेंबर २००४ रोजी या शोचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. लक्षणीय बाब म्हणजे या शोच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या खासगी आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे खुलासे केले आहेत. दरम्यान सध्या करण जोहर त्याच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग मे महिन्यात शूट होणार आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी