Box Office Prediction: विरोधाच्या पार्श्वभूमीवर'रक्षाबंधन' आणि 'लाल सिंह चड्ढा' रिलीज होणार, कशी असेल कमाई जाणून घ्या

बी टाऊन
Updated Aug 04, 2022 | 14:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Laal Singh Chaddha and Raksha Bandhan Box office Prediction: अक्षय कुमार (Akshay Kumar ) स्टारर रक्षाबंधन आणि आमिर खानचा लाल सिंग चड्ढा 11 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर (Box office ) भिडणार आहेत. या दोन्ही चित्रपटांना सोशल मीडियावर प्रचंड विरोध होत आहे.

Laal Singh Chaddha and Raksha Bandhan combined box office Prediction
लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधन रिलीज होणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 11 ऑगस्ट हा दिवस सिनेप्रेमींसाठी खास असणार आहे.
  • 11 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर दोन दिग्गज कलाकारांची टक्कर होणार आहे.
  • अक्षय कुमार स्टारर रक्षाबंधन आणि आमिर खानचा लाल सिंग चड्ढा होणार रिलीज

Laal Singh Chaddha and Raksha Bandhan Box office Prediction: 11 ऑगस्ट हा दिवस सिनेप्रेमींसाठी खास असणार आहे. या दिवशी बॉक्स ऑफिसवर दोन दिग्गज कलाकारांची टक्कर होणार आहे. एकीकडे सुपरस्टार अक्षय कुमारचा (Akshay kumar )आनंद एल राय दिग्दर्शित रक्षाबंधन (Raksha Bandhan ) हा चित्रपट रिलीज होत आहे तर दुसरीकडे आमिर खान (Amir Khan ) आणि करीना कपूरचा (Kareena Kapoor-khan )बहुप्रतिक्षित ‘लाल सिंग चड्ढा’ रिलीज होणार आहे. या दोन्ही चित्रपटांना सोशल मीडियावर प्रचंड विरोध होत आहे. (Laal Singh Chaddha and Raksha Bandhan combined box office Prediction )

अधिक वाचा :  डोंबिवलीतील 'त्या' महिलेविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल


एकीकडे ट्विटरवर 'लाल सिंह चड्ढा'वर बहिष्कार घालण्याची मागणी वाढत आहे, तर दुसरीकडे रक्षाबंधनावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत आहे. दोन्ही सिनेमांवर बहिष्कार टाकण्याबाबत लाखो ट्विट करण्यात आले आहेत. या अभिनेत्यांनी केलेल्या ट्विटवरून वाद निर्माण झाला आहे. त्याचबरोबर आमिर खानच्या पीके चित्रपटावर देवी-देवतांची खिल्ली उडवल्याबद्दल निशाणा साधला जात आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटांची कमाई कशी होणार हा प्रश्न आहे.

अधिक वाचा : राखी सावंत का होतोय व्हायरल?


ट्रेड अॅनालिस्ट सुमित कडेल यांच्या मते, 11 ऑगस्टच्या पहिल्या दिवशी या दोन सिनेमांचे एकत्रित कलेक्शन 22 ते 25 कोटींच्या दरम्यान असू शकते. या सिनेमाला ज्या प्रकारचा विरोध होत आहे, तो निर्मात्यांसाठी चिंतेचा विषय असल्याचे जाणकारांचे मत आहे. 2022 हे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीसाठी चांगले नाही. काही निवडक सिनेमा सोडले तर एकही सिनेमा विशेष कामगिरी दाखवू शकलेला नाही.  अशा परिस्थितीत सोशल मीडियावरील या विरोधामुळे सिनेमांना फटका बसणार आहे.


रक्षाबंधन या चित्रपटात अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर शिकारा या सिनेमात अभिनेत्री सादिया खतीब, सहजमीन कौर, दीपिका खन्ना आणि स्मृती श्रीकांत अक्षय कुमारच्या बहिणीची भूमिका साकारत आहेत. त्याचवेळी आमिर खान लाल सिंग चड्ढामध्ये सरदारची भूमिका साकारत आहे आणि करीना त्याच्या बायकोची भूमिका साकारत आहे. साऊथ स्टार नागा चैतन्यही 'लाल सिंग चड्ढा'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी