Lady Gaga special announcement : हॉलिवूड गायिका आणि अभिनेत्री लेडी (Lady Gaga ) गागा जोकर फ्रँचायझीचा एक भाग असेल याची पुष्टी तिने केली आहे.
या अभिनेत्रीने चित्रपटाचा म्युझिक टीझर सोशल मीडियावर शेअर करताना 'जोकर: फोली ड्यूक्स'मध्ये ती असल्याची घोषणा तिने केली. या चित्रपटात लेडी गागा जॉकीन फिनिक्ससोबत ( Joaquin phoenix ) दिसणार आहे. (Lady Gaga will share the screen with joaquin phoenix in Joker sequel)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही एक म्युझिकल फिल्म असेल आणि जोकरच्या सिक्वेलमध्ये लेडी गागा हार्ले क्वीनच्या भूमिकेत दिसणार आहे. 7 जून रोजी, सिनेमाचे दिग्दर्शक टॉड फिलिप्स यांनी इन्स्टाग्रामवर पटकथा कव्हर शेअर केले आणि फोली ड्यूक्स हे सिनेमाचे उपशीर्षक असल्याचे उघड केले.
अधिक वाचा : स्विगीची आकर्षक ऑफर, भारतात खासगी कंपनीचा पहिला मोठा प्रयोग
या सिनेमात जॉकीन फिनिक्स जोकरच्या भूमिकेत दिसणार आहे. 2019 मध्ये आलेल्या जोकरच्या पहिल्या भागासाठी जॉकिनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर देण्यात आला होता. 92 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये जोकरला सर्वाधिक पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. सिनेमाच्या टीझरमधील पार्श्वसंगीत लेडी गागाच्या चीक टू चीक या गाण्याला देण्यात आले आहे. हे गाणे गागाच्या संगीत कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गाणे आहे.
लेडी गागाच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर काही लोक तिची स्तुती करत आहेत, तर काही जण तिच्यावर टीकाही करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, 'तुला स्क्रीनवर पाहण्यासाठी मी अजून वाट पाहू शकत नाही.' दुसर्याने लिहिले, 'मला वाटते की ती खूप चांगले काम करेल.' काही लोकांनी गागावर टीका करत 'ती बरबाद करेल' असे लिहिले. दुसर्याने लिहिले, 'तुम्ही इतका चांगला चित्रपट खराब करू नये अशी आमची इच्छा आहे. तू चांगली अभिनेत्री नाहीस आणि तू फक्त तुझ्या संगीतावर लक्ष केंद्रित कर.
अधिक वाचा : दहीहंडीसाठी भाजप- मनसेची स्किम; गोविंदांना 'विमा' कवच
हा सिनेमा 4 ऑक्टोबर 2024 रोजी रिलीज होणार आहे. सिनेमाच्या पहिल्या भागाने जगभरात 1 अब्ज डॉलर्स म्हणजेच 107 कोटींची कमाई केली होती. यासह हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमाची कथा मानसिक आजारी विनोदी अभिनेता आर्थर फ्लेकची आहे. आर्थरच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील घटना त्याला गुन्हेगारी विश्वात घेऊन जातात.