ऋषी कपूरची अभिनेत्री रंजिता कौरने केली पतीची धुलाई, जीव वाचविण्यासाठी पोलिसांकडे घेतली धाव 

बी टाऊन
Updated May 28, 2019 | 19:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

८० च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रंजिता कौर यांच्या विरूद्ध पती राज याने माहराण केल्याचा आरोप लावत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दोघांमध्ये मुलावरून वाद निर्माण झाला आहे. दरम्यान आता पतीने आपली तक्रार मागे

rishi kapoor and ranjeeta
ऋषी कपूर आणि रंजिता 

पुणे :  ८० च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रंजिता कौर यांनी अनेक चित्रपटात काम केले आहेत. पण त्यांची ओळख ऋषी कपूर यांच्यासोबत केलेल्या 'लैला मजनू' साठी होते. आता पुन्हा एकदा रंजिता एका धक्कादायक बातमीसाठी चर्चेत आल्या आहेत.  त्यांच्याबाबत आलेल्या बातम्यांनुसार दावा करण्यात येत आहे. त्यांनी आपल्या पतीला मारहाण केली. इतकेच नाही तर त्यांनी  पतीला चौथ्या मजल्यावरून धक्का देण्याचा प्रयत्नही केल्याचा तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी  रंजिता यांच्या पतीने मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली. 

रंजिताचे पती राज मसंद यांनी पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.  पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आता कुटुंब सर्व काही ठीक असल्याचे म्हणत आहे. दरम्यान, रंजिता कौर यांच्या पतीने सिनियर सिटीझन हेल्पलाइन द्वारे पत्नी विरोधात तक्रार दाखल होती. पुणे मिररनुसार रंजिता आपला मुलगा स्काय सोबत आपल्या पतीला शारिरीक छळ करत होती. राज मसंद यांनी पोलीस तक्रारीत या गोष्टीचा उल्लेख केला आहे. मारहाणीशिवाय जीवे मारण्याचाही प्रयत्न केल्याचाही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता पाहून या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतली आणि कारवाई केली. 

रंजिता कौर आणि राज मसंद यांच्या वाद हा आपल्या मुलामुळे सुरू झाला. मिळालेल्या माहितीनुसार राज यांनी आपल्या मुलाला पैसे देण्यास नकार दिला. त्यांचा मुलगा अमेरिकेत शिक्षण घेतल्यानंतर आता व्यवसाय करत आहे. पैसे न दिल्याने झालेल्या वादानंतर राज यांचा अडचणींचा सामना करावा लागला. त्यांनी पोलिसाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मुलाने त्यांना धमकविण्यास सुरूवात केली. 

आता हे प्रकरण समोर आल्यानंतर रंजिता यांनी मीडियाशी बातचित केली आहे. रंजिता यांनी सांगितले की, वाद प्रत्येक घरात होत असतात. माझे पती अमेरिकेत काम करत होते. मुलगाही त्यांच्या सोबत काम करत होता. त्यांच्या बिझनेस संदर्भात वाद झाला. वाद इतका वाढला की माझ्या पतीने पोलिसांची मदत घेतली. 

आता रंजिता यांच्या पतीनेही आपली तक्रार मागे घेतली आहे. तेही म्हणाहेत की वाद बिझनेसवरून झाला आहे. त्यामुळे आता कोणतीही तक्रार दाखल करू इच्छित नाही.  
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
ऋषी कपूरची अभिनेत्री रंजिता कौरने केली पतीची धुलाई, जीव वाचविण्यासाठी पोलिसांकडे घेतली धाव  Description: ८० च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रंजिता कौर यांच्या विरूद्ध पती राज याने माहराण केल्याचा आरोप लावत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दोघांमध्ये मुलावरून वाद निर्माण झाला आहे. दरम्यान आता पतीने आपली तक्रार मागे
Loading...
Loading...
Loading...