Sharmaji Namkeen Review : ऋषी कपूर यांना अखेरचा सलाम... 'शो मस्ट गो ऑन' 'शर्माजी नमकीन'ने सिद्ध केले

बी टाऊन
Updated Mar 31, 2022 | 14:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sharmaji Namkeen Review :हिंदी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच एखाद्या अभिनेत्याच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिग्गजाने उर्वरित दृश्ये पूर्ण केली आहेत. बर्‍याच प्रकरणांमध्ये, एकतर चित्रपट थांबवला जातो किंवा संपूर्ण चित्रपट दुसर्‍या कलाकारांसह पुन्हा शूट केला जातो. या कारणांमुळे शर्मा जी नमकीन हा एक अनोखा चित्रपट ठरतो.

Last salute to Rishi Kapoor, 'Show Must Go On' proved by 'Sharmaji Namkeen'
हसवणारा, गुदगुल्या करणारा शर्माजी नमकीन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शर्माजी नमकीन हा ऋषी कपूरचा शेवटचा चित्रपट
  • नमकीनने निवृत्तीनंतरच्या अर्थातच सेकंड इनिंगचे चित्रण करण्यात आले आहे.
  • या कारणांमुळे शर्माजी नमकीन हा सिनेमा अनोखा ठरतो

Sharmaji Namkeen Review : चित्रपटाची सुरुवात ऋषी कपूरचा मुलगा रणबीर कपूरच्या व्हिडिओने होते, जिथे रणबीर स्पष्ट करतो की या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऋषी हे जग सोडून गेले आणि रणबीरनेही प्रोस्थेटिकचा अवलंब केला जेणे करून चित्रपट पूर्ण होईल पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. अशा परिस्थितीत परेश रावल हा सिनेमा स्वीकारला आणि त्यांनी ऋषी कपूरची भूमिका पुढे नेली, यासाठी परेश रावल यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. 

कथेची सुरुवात शर्मा जी (ऋषी कपूर) यांच्या निवृत्तीपासून होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी व्हीआरएस घेतली आहे. दोन मुलांचे वडील शर्मा जी, घरात आई आणि वडील दोघांची जबाबदारी पार पाडत आहेत. स्वयंपाक करण्यापासून ते बँक आणि बिले भरण्यापर्यंतची सर्व कामे शर्मा स्वतः करतात. निवृत्तीनंतरही शर्माजींना स्वतःला व्यस्त ठेवायचे आहे. 
अशा परिस्थितीत ते कधी झुंबा क्लासला जातात तर कधी नोकरीच्या शोधात दिवस काढतात.  शर्माजींसाठी स्वयंपाक ही एक कला आहे, त्यांनी बनवलेल्या जेवणाची संपूर्ण परिसरात प्रशंसा झाली आहे. आणि हेच आपले पॅशन ते आपली दुसरी इनिंग सुरू करण्यासाठी सुरू करतात.  आणि त्यांना लेडीज किटी पार्टीची पहिली ऑर्डर मिळते. मात्र, त्यांची ही आवड त्याच्या मुलांसाठी लाजिरवाणी ठरते. कुटुंबातील मजा, कुटुंबातील विनोद, मुलांच्या नजरेतील राग इत्यादींना सामोरे गेल्यावर शर्माजी काय निर्णय घेतात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. 


दिग्दर्शक हितेश भाटिया यांनी दिल्लीच्या पार्श्वभूमीवर या कथेची मांडणी केली आहे. दिल्लीचे अरुंद रस्ते आणि जगण्याची पद्धत पडद्यावर सुंदरपणे मांडण्यात आली आहे.
दिग्दर्शनाबद्दल बोलायचे झाले तर, दोन भिन्न कलाकारांमध्ये एकच पात्र मिसळणे प्रेक्षकांसाठी खूप कठीण आहे, मात्र, दिग्दर्शकालाही हा प्रयोग चांगलाच जमला आहे. 
परेश रावल यांचं कौतुकच करावं लागेल की त्यांनी ही व्यक्तिरेखा श्रद्धांजली म्हणून पडद्यावर आणली, हे कुणी करत नाही. चित्रपटाची कथा पाहिल्यावर असे वाटेल की हे सर्व आपल्यासोबत किंवा आजूबाजूला घडले आहे. सापेक्षतेमुळे कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते. ऋषी कपूरच्या शेवटच्या चित्रपटाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, 
या चित्रपटातील अनेक लूप होल्स तुम्हाला दूर करता येणार नाहीत. कुठेतरी भावना हावी होताना दिसतील. हा हसवणारा-गुदगुल्या करणारा चित्रपट खाद्यप्रेमींना आवडेल. 
बागबानसारखे काही संवाद मुलांच्या अभ्यासक्रमात सक्तीचे केले पाहिजेत, तर ऋषी कपूर आणि जुही चावला यांच्यातील केमिस्ट्री तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवते.


कॅन्सरशी लढा देणाऱ्या ऋषी कपूरच्या अभिनयाने, परिस्थिती कशीही असो, शो मस्ट गो ऑन हे पुन्हा सिद्ध केले. जेव्हा जेव्हा ऋषी पडद्यावर येतो तेव्हा तो आता या जगात नाही हे सत्य स्वीकारणे कठीण होते. परेश रावल सुरुवातीला अभिनयात खूप सावध दिसतात पण पुढे त्यांचा उत्स्फूर्तपणा दिसून येतो. शर्मा जी यांचा मुलगा सुहेल नायर याने त्यांच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. जुही चावला आणि किट्टी गँगमध्ये सामील असलेल्या आयेशा रझा, शिबा चड्डा यांनी दिल्लीच्या सामान्य गृहिणीला उत्तम पद्धतीने पडद्यावर आणले आहे. परमीत शेट्टीने कमी वेळात आपली छाप सोडली आहे. सतीश कौशिक एक पंजाबी मित्र म्हणून भूमिकेत फिट आहेत. 

ऋषी कपूर यांना श्रद्धांजली म्हणून सिनेप्रेमींना हा चित्रपट पाहता येईल. कथेच्या या भावनिक राईडमध्ये तुम्हाला कुठेही कंटाळा येणार नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी