Lata Mangeshkar Corona: लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jan 11, 2022 | 13:48 IST

Lata Mangeshkar  देशात पुन्हा एकदा कोरोनाचे (Corona) रुग्ण (Patient) वाढत आहेत. अनेक आमदार खासदारांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतलं आहे.  बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींनाही (Celebrities) कोरोनाची लागण झाली आहे.

Lata Mangeshkar admitted to Breach Candy Hospital
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर कोरोना पॉझिटिव्ह  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लता दीदी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या अनेकदा चाहत्यांसाठी जुने फोटो आणि मनोरंजक किस्से शेअर करताना दिसतात.
  • लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणे
  • लता दीदी यांना नोव्हेंबर 2019 मध्येही श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला होता.

Lata Mangeshkar  मुंबई:  देशात पुन्हा एकदा कोरोनाचे (Corona) रुग्ण (Patient) वाढत आहेत. अनेक आमदार खासदारांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतलं आहे.  बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींनाही (Celebrities) कोरोनाची लागण झाली आहे. दिग्गज गायिका लता मंगेशकर यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांना तातडीने मुंबईतील (Mumbai) ब्रीच कॅंडी (Breach candy) रुग्णालयातील (Hospital) आयसीयूमध्ये (ICU) दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. 

मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. येथील डॉक्टरांनी सांगितले की, लता मंगेशकर यांना वयोमानानुसार समस्या आहे. लता मंगेशकर यांची भाची रचना यांनी कुटुंबाला प्रायव्हसी देण्यास सांगितले तसेच लता दीदींसाठी देवाकडे प्रार्थना करण्याचीही विनंती केली. दरम्यान, यापूर्वी, लता दीदी यांना नोव्हेंबर 2019 मध्ये श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

श्वासोच्छवासाचा त्रास

मिळालेल्या माहितीनुसार, 92 वर्षीय लता दीदी यांना 2019 च्या नोव्हेंबर महिन्यात श्वास घेण्यास त्रास झाला होता. त्यानंतरही त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना काही दिवसांत डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळीही देश कोविडशी लढा देत होता.

सोशल मीडियावर अॅक्टिव राहतात लता दीदी

लता मंगेशकर यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांचा 92 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव केला गेला. लता दीदी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या अनेकदा चाहत्यांसाठी जुने फोटो आणि मनोरंजक किस्से शेअर करताना दिसतात. लता मंगेशकर यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी