Lata Mangeshkar : मुंबई : मुंबईमध्ये (Mumbai) पसरणाऱ्या कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेमध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनाही कोरोना संसर्ग (Corona infection) झाल्याचे समोर आले होते, त्या ९२ वर्षांच्या आहेत. त्यांना वैद्यकीय देखरेखीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयातील (Breach Candy Hospital) अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होतं. ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. लता दिदींना लवकरच डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, असं म्हटलं जात आहे. (Lata Mangeshkar's recovery; Likely to be discharged soon)
ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतीक समधानी यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला दिलेल्या माहितीनुसार लता दीदींना कोरोनासोबतच न्यूमोनियाही झाला होता. त्यांचं वय पाहता, प्रकृती सुधारण्यास वेळ लागेल, असंही त्यांनी म्हटलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं, तसंच त्या लवकर बऱ्या व्हाव्या, यासाठी प्रार्थना करा, असं आवाहनही डॉक्टरांनी केलं होतं.
लता दीदींना यांना डिस्चार्ज देण्यापूर्वी डॉक्टरांना त्या पूर्णपणे बरे झाल्याची खात्री करून घ्यायची आहे. लता मंगेशकर यांची भाची रचना शाह यांनी दीदींच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. 'दीदींची तब्येत स्थीर आणि व्यवस्थीत आहे. देवाची कृपा आहे. त्या लढवय्या आहेत. आपण त्यांना इतकी वर्षे ओळखत आहोत. त्यांच्या चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेमुळं त्यांची तब्येत सुधारतेय. त्यांचे खूप आभार', असं रचना शाह म्हणाल्या.
सन २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.