Neetha Shetty: 'गंदी बात'च्या बोल्ड सीनमुळे नीताला रातोरात मिळाली होती प्रसिद्धी; नीताचे ३७ व्या वर्षात पदार्पण

बी टाऊन
Updated Jun 22, 2022 | 10:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Neetha Shetty Birthday । २० जून १९८६ रोजी बंगळुरूमध्ये जन्मलेली नीता आज तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. दक्षिण भारतातील नीता ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती बऱ्याच दिवसांपासून हिंदी मालिकांमध्ये काम करत आहे.

Learn some things about the her world of acting on Neetha Shetty birthday
गंदी बात'च्या बोल्ड सीनमुळे नीताला रातोरात मिळाली प्रसिद्धी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गंदी बात'च्या बोल्ड सीनमुळे नीताला रातोरात मिळाली प्रसिद्धी.
  • नीताचे ३७ व्या वर्षात पदार्पण.
  • २० जून १९८६ रोजी बंगळुरूमध्ये जन्मलेली नीता आज तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Neetha Shetty Birthday । मुंबई : २० जून १९८६ रोजी बंगळुरूमध्ये जन्मलेली नीता आज तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. दक्षिण भारतातील नीता ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती बऱ्याच दिवसांपासून हिंदी मालिकांमध्ये काम करत आहे. नीता शेट्टी पहिल्यांदा 'तुम बिन जाने कहाँ' या टीव्ही शोमध्ये दिसली होती. यानंतर ती अनेक टीव्ही शोमध्ये दिसली होती. पण खरी ओळख तिला एकता कपूरच्या वेबसीरिजने दिली, ज्यामुळे ती रातोरात प्रसिद्ध झाली. दरम्यान तिच्या वाढदिवसानिमित्त चला तर मग एक नजर टाकूया तिच्या प्रवासाबद्दल. (Learn some things about the her world of acting on Neetha Shetty birthday). 

अधिक वाचा : राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण

अनेक मालिकांमध्ये केले आहे काम 

नीता शेट्टी २००३ पासून अभिनय जगतात सक्रिय आहे. 'तुम बिन जाने कहाँ' व्यतिरिक्त ती झी टीव्हीवरील 'ममता' आणि 'बनूं मैं तेरी दुल्हन' या मालिकेत दिसली आहे. 'कहीं तो होगा'मधील डॉ. अर्चिता, 'घर की लक्ष्मी बेटियां'मधील गौरी गरोडिया आणि 'प्यार की ये एक कहानी'मधील सुगंध जैस्वाल यांच्या भूमिकेतील तिच्या अभिनयानेही लोकांना तिने भुरळ घातली होती. या मालिकांव्यतिरिक्त नीता 'बिग बॉस मराठी' या रिॲलिटी शोमध्ये दिसली आहे. या शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये तिला वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळाली. लक्षणीय बाब म्हणजे महेश मांजरेकर यांनी हा शो होस्ट केला होता.

चित्रपटांमध्येही केले आहे काम 

नीताने टीव्ही सीरियल्सशिवाय चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ती पहिल्यांदा २००५ मध्ये अनीस बज्मीच्या 'नो एन्ट्री' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिची भूमिका छोटी होती. याशिवाय ती 'साँसे' आणि 'फुगे' या मराठी चित्रपटातही दिसली आहे. मात्र अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसल्यानंतरही नीताला हवी तशी लोकप्रियता मिळाली नव्हती. 

गंदी बात'च्या बोल्ड सीनमुळे रातोरात मिळाली प्रसिद्धी 

टीव्ही सीरियलमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने नीता ओटीटीकडे वळली. हा निर्णय तिच्यासाठी खूप फायदेशीर ठरला. २०१८ मध्ये तिने 'गंदी बात'च्या पहिल्या सीझनमध्ये काम केले होते. या वेबसीरिजमुळे ती रातोरात प्रसिद्ध झाली. एकता कपूरच्या या वेब सीरिजमध्ये लोकांना नीताची अशी स्टाइल पाहायला मिळाली जी त्यांनी कधीच पाहिली नव्हती. गंदी बात वेब सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये नीताने खूप बोल्ड सीन्स दिले होते. तिच्या बोल्ड स्टाइलमुळे तिची सर्वत्र चर्चा रंगली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी