Alia Ranbir Wedding: आलिया-रणबीरच्या लग्नाने कोण खुश आणि कोण नाराज? ऐका चाहत्यांचे म्हणणे

Alia Ranbir Wedding । बॉलिवूडमधील बहुचर्चित कपल आलिया आणि रणबीर अखेर लग्नबंधनात अडकले आहे. १४ एप्रिल रोजी म्हणजेच आज गुरूवारी त्यांचा विवाह सोहळा पार पाडला. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दोघांचे लग्न हे बी-टाऊनच्या भव्य लग्नांपैकी एक मानले जात आहे.

Listen to the different reactions of fans regarding Alia and Ranbir's wedding
आलिया-रणबीरच्या लग्नाने कोण खुश आणि कोण नाराज?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूडमधील बहुचर्चित कपल आलिया आणि रणबीर अखेर लग्नबंधनात अडकले आहे.
  • मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
  • दोघांचे लग्न हे बी-टाऊनच्या भव्य लग्नांपैकी एक मानले जात आहे.

Alia Ranbir Wedding । मुंबई : बॉलिवूडमधील बहुचर्चित कपल आलिया आणि रणबीर अखेर लग्नबंधनात अडकले आहे. १४ एप्रिल रोजी म्हणजेच आज गुरूवारी त्यांचा विवाह सोहळा पार पाडला. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दोघांचे लग्न हे बी-टाऊनच्या भव्य लग्नांपैकी एक मानले जात आहे. या बहुचर्चित लग्नासाठी बॉलिवूडमधील दिग्गजांनी हजेरी लावली. दरम्यान या लग्नानंतर विविध स्तरातून अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. (Listen to the different reactions of fans regarding Alia and Ranbir's wedding). 

दरम्यान, अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी आज मुंबईत लग्न केले. एकीकडे त्यांच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक अपडेट व्हायरल होत असताना दुसरीकडे त्यांच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी असे उत्तर दिले की तुम्हीही हसू आवरू शकणार नाही.

काही चाहत्यांनी तर हे नातं फार काळ टिकेल याबाबत शंका असल्याची भाकिते सांगितले आहेत. तर काहींनी या नवजोडप्याला नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

दिग्गजांनी लावली हजेरी

या बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्याच्या लग्नासाठी दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. यामध्ये करण जोहर, करिना कपूर, भट्ट कुटुंबातील सदस्य, सैफ अली खान यांच्यासह काही दिग्गजांनी हजेरी लावली. तसेच आलियाची आई, सोनी राजदान या सर्वांचे फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी आणि प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळे मेनू तयार केले गेले होते ज्यामध्ये जवळजवळ सर्व पदार्थांची व्यवस्था केली गेली. विशेष म्हणजे या मेनूमध्ये वर-रणबीर कपूर आणि वधू आलिया भट्ट तसेच पाहुण्यांच्या निवडीची काळजी घेण्यात आली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी