Lock Upp: 'लॉक अप' हिट झाल्यानंतर कंगनाने साधला करण जोहरवर निशाणा; म्हणाली- तुझे रडण्याचे दिवस आले

kangana ranaut on karan johar | बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत तिच्या डॅशिंग स्टाइलसाठी खूप प्रसिध्द आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा तिने दिग्दर्शक करण जोहरवर जोरदार निशाणा साधला आहे. कंगणाने सांगितले की, तिच्या 'लॉक अप' या शोला विक्रमी व्ह्यूज मिळाले आहेत.

Lock Upp After hitting 'Lock Up', Kangana post on Karan Johar
'लॉक अप' हिट झाल्यानंतर कंगनाने साधला करण जोहरवर निशाणा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कंगना राणावतचा रिअ‍ॅलिटी शो लॉक अप सध्या खूप चर्चेत आहे.
  • कंगनाने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली असून त्यात तिने इंटस्ट्रीतील काही लोकांवर निशाणा साधला आहे.
  • लॉक अपचे व्ह्यूज २०० मिलियन झाले आहेत.

kangana ranaut on karan johar | मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) तिच्या डॅशिंग स्टाइलसाठी खूप प्रसिद्ध आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा तिने दिग्दर्शक करण जोहरवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  कंगणाने म्हणाली की, तिच्या 'लॉक अप' (Lock Upp) या शोला विक्रमी व्ह्यूज मिळाले आहेत. या आनंदात तिने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली असून त्यात तिने इंटस्ट्रीतील काही लोकांवर निशाणा साधला आहे. लक्षणीय बाब म्हणजे तिने त्या सेलिब्रिटींची नावे लिहिली नसली तरी तिचा कोणावर निशाणा आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे. 

अधिक वाचा : या दिशेला चुकूनही विवाहित महिलांनी झोपू नये

करण जोहरवर साधला निशाणा

कंगना राणावतने म्हटले की, तिचा शो लॉक अपचे व्ह्यूज २०० मिलियन झाले आहेत. अशा स्थितीत तिने इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले की, "लॉक अप शोला २०० मिलियन व्ह्यूज मिळताच... सर्वत्र संपूर्ण चंगु-मंगू सैन्याची आणि त्यांच्या माध्यमासोबत त्यांचे पप्पा गुपचूप रडत आहेत. एवढी आव्हाने असताना देखील २०० मिलियन आणि आता पुढे बघा आणखी काय काय होते ते... तुझे रडण्याचे दिवस आले आहेत." असे कंगणाने पोस्टमध्ये म्हटले. 

 Kangana Ranaut slams Karan Johar

अधिक वाचा : कोरोनाच्या चौथ्या लाटेत तुमच्या दातांना धोका

१०० मिलियन व्ह्यूजवर व्यक्त केला आनंद

यापूर्वी कंगना राणावतने १९ दिवसांत १० कोटी (100 Million) व्ह्यूज मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. माध्यमांच्या माहितीनुसार कंगनाने म्हटले होते की, १९ दिवसांत १०० मिलियन व्ह्यूज अविस्मरणीय आहेत आणि 'लॉक अप'ला प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम पाहून मी भारावून गेली आहे. यावरून हे सिद्ध होते की शोची संकल्पना अद्वितीय आणि अतिशय मनोरंजक आहे. 

या ओटीटीवर स्ट्रीम होतो शो 

तिने आणखी म्हटले की, "शोची कल्पना हा पुरावा आहे की एकता कपूरच्या व्हिजनने पुन्हा एकदा सर्वांवर प्रभाव टाकला आहे आणि एमएक्स प्लेअरच्या प्रचंड आवाक्यामुळे हा शो प्रेक्षकांना आकर्षित करण्यात सक्षम आहे. लॉक अप आता आणखी निर्भय होणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे लॉक अपचा शो आता Alt Balaji आणि MX Player वर स्ट्रीम होत असल्याची माहिती आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी