अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या अभिनेत्रीनं मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा केला पराभव

बी टाऊन
Updated May 25, 2019 | 21:24 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील निकालानं अनेक बाबतीत रेकॉर्ड मोडले आहेत. अनेक नवीन इतिहास रचले गेले आहेत. असाच एक इतिहास रचलाय एका अभिनेत्रीनं. तिनं अपक्ष निवडणूक लढवून चक्क मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा पराभव केलाय.

Actress Sumanlatha Ambreesh
'या' अभिनेत्रीनं निवडणुकीत केला मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा पराभव 

मुंबई: लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं ३०३ जागांवर विजय मिळवत एक इतिहास रचलाय. एनडीएला एकूण ३५२ जागा मिळाल्या आहेत. भाजपच्या या इतिहासात एका राज्यातील अभिनेत्रीनं एक ऐतिहासिक विजय मिळवलाय. ती अभिनेत्री आहे सुमनलता अंबरीश आणि ते राज्य आहे कर्नाटक. कर्नाटकात भाजपनं २३ जागांवर विजय मिळवला. पण तिथं कन्नड अभिनेत्री सुमनलता अंबरीशनं मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या मुलाचा तब्बल १ लाख मतांनी पराभव केलाय.

निखिल कुमारस्वामी विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून सुमनलता यांनी मंड्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आहे. ५२ वर्षीय सुमनलता या प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत २२० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय.

सुमनलता यांच्या विरोधात भाजपनं आपला कुठलाही उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे त्यांच्या सामना सरळ-सरळ निखिल कुमारस्वामी यांच्या सोबत होता. निवडणुकीदरम्यान भाजपनं सुमनलता यांना पाठिंबा दिला होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Sumalatha Ambareesh (@sumalathaamarnath) on

गेल्या वर्षी झाला सुमनलता यांच्या पतीचा मृत्यू

सुमनलता यांनी कन्नड अभिनेते आणि राजकारणी अंबरीश यांच्यासोबत विवाह केला होता. अंबरीश यांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला होता. अंबरीश हे मंड्या मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. तर अंबरीश यांच्या मृत्यूनंतर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या सुमनलता यांना जेडीएसनं मात्र संधीसाधू असल्याचा आरोप केला आहे.

सुमनलता यांच्यासाठी कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील यश आणि दर्शन या अभिनेत्यांनीही प्रचार केला होता. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी या अभिनेत्यांना त्यांचं करिअर संपविण्याची धमकीही दिली होती. सुमनलता यांच्याशिवाय कर्नाटकच्या बंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघातून अभिनेते प्रकाश राज यांनीही निवडणूक लढवली. मात्र त्यांचा दारुण पराभव झालाय.

२२० चित्रपटांमध्ये केलं काम

सुमनलता यांनी तमिळ, मल्याळम, कन्नड, तेलुगू आणि हिंदी या भाषांमधील २२० चित्रपटांमध्ये काम केलंय. सुमनलता यांना १९८७ साली रिलीज झालेला चित्रपट थुवानाथुंबिकल पासून प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाचं दिग्दर्शन पी. पद्माराजन यांनी केलं होतं.

सुमनलता यांनी प्रतिबंध, परदेसी आणि महानता सारख्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केलंय. सुमनलता आणि अंबरीश यांचा विवाह १९९१ मध्ये झाली होती. अंबरीश आणि सुमनलता यांनी आहुती, अवतार पुरुष या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. सुमन आणि अंबरीश यांना एक मुलगा आहे, त्याचं नाव अभिषेक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या अभिनेत्रीनं मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा केला पराभव Description: यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील निकालानं अनेक बाबतीत रेकॉर्ड मोडले आहेत. अनेक नवीन इतिहास रचले गेले आहेत. असाच एक इतिहास रचलाय एका अभिनेत्रीनं. तिनं अपक्ष निवडणूक लढवून चक्क मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा पराभव केलाय.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles