सैफ अली खानला बसलेला प्रॉपर्टी स्कॅमचा फटका

Lost 70 Percent of My Earnings in a Property Scam in Mumbai: Saif Ali Khan बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याला प्रॉपर्टी स्कॅमचा फटका बसला. स्कॅममुळे सैफने त्याच्या त्यावेळेपर्यंतच्या उत्पन्नातील ७० टक्के संपत्ती गमावल्याचे सांगितले.

Lost 70 Percent of My Earnings in a Property Scam in Mumbai: Saif Ali Khan
सैफ अली खानला बसलेला प्रॉपर्टी स्कॅमचा फटका 
थोडं पण कामाचं
  • सैफ अली खानला बसलेला प्रॉपर्टी स्कॅमचा फटका
  • ७० टक्के संपत्ती गमावली - सैफ अली खान
  • घटनेला काही वर्ष होऊन गेली तरी ती प्रॉपर्टी आजही त्याच्या मालकीची झालेली नाही

Lost 70 Percent of My Earnings in a Property Scam in Mumbai: Saif Ali Khan मुंबईः बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याला प्रॉपर्टी स्कॅमचा फटका बसला. स्कॅममुळे सैफने त्याच्या त्यावेळेपर्यंतच्या उत्पन्नातील ७० टक्के संपत्ती गमावल्याचे सांगितले. या घटनेला काही वर्ष होऊन गेली तरी ती प्रॉपर्टी आजही त्याच्या मालकीची झालेली नाही. 

ऑफिससाठी तुम्हाला हवी असलेली मोक्याची जागा तीन वर्षांनी तुमच्या ताब्यात असेल असे सांगण्यात आले. या घटनेला दीर्घ काळ झाला आणि कोरोनामुळे यात आणखी दोन वर्षांची भर पडली पण प्रॉपर्टीचा ताबा मिळालेला नाही, असे सैफ अली खान याने सांगितले.

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांच्यातील बातचीत यशराज फिल्मच्या अधिकृत यू ट्युब चॅनलवर अपलोड करण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये सैफ अली खान एका प्रॉपर्टी स्कॅमविषयी बोलताना दिसत आहे.

सैफचे कुटुंबासह नव्या घरात स्थलांतर

सैफ अली खान आणि करीना कपूर या दांपत्याचा दुसरा मुलगा जहांगिर याचा जन्म झाला. यानंतर सैफ आणि त्याच्या कुटुंबाने नव्या घरात स्थलांतर केले. सैफने त्याचे फॉर्च्युन हाइट्स येथील १५०० चौरस फुटांचे घर आणि दोन कार पार्किंग स्पेसची जागा भाडेपट्टीवर तीन वर्षांसाठी देण्याचा निर्णय घेतला. भाड्यामधून दरमहा साडेतीन लाख रुपये सैफला मिळणार आहेत. हे पहिल्या वर्षाचे भाडे आहे. दुसऱ्या वर्षी मासिक भाडे ३.६७ लाख आणि तिसऱ्या वर्षी मासिक भाडे ३.८७ लाख रुपये होणार आहे. 

बंटी और बबली २ सिनेमा

'बंटी और बबली २' हा सिनेमा आज (शुक्रवार १९ नोव्हेंबर २०२१) दोन ठिकाणी प्रदर्शित झाला. या सिनेमात राकेश त्रिवेदी बंटीच्या भूमिकेत तर राणी मुखर्जी बबलीच्या भूमिकेत आहे. सिनेमात सैफ अली खान पण एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 'हम तुम' नंतर 'बंटी और बबली २' च्या निमित्ताने तब्बल बारा वर्षांनी सैफ अली खान आणि राणी मुखर्जी एका सिनेमात दिसत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी