Sapna Choudhary : हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि गायिका सपना चौधरीच्या (Sapna Choudhary) विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 2018 च्या एका प्रकरणात बिग बॉसच्या माजी स्पर्धकाविरुद्ध हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. 2018 मध्ये,सपना चौधरीने एका कार्यक्रमासाठी निर्मात्यांकडून आगाऊ फी घेतली होती, ज्याची सर्व तिकिटे विकली गेली होती, परंतु सपना तेथे परफॉर्म करण्यासाठी पोहोचली नाही.
अधिक वाचा : जागतिक वडा पाव दिनानिमित्त भन्नाट Memes व्हायरल
ज्या प्रकरणात सपना चौधरीला अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फी घेऊनही सपना कार्यक्रमाला न पोहोचल्याने संतापलेल्या आयोजकांनी हे प्रकरण कोर्टात खेचले
आणि आता सपनाला लखनऊच्या एसीजेएम कोर्टात हजर राहावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण 13 ऑक्टोबर 2018 चे आहे. याप्रकरणी अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. सपनावर फसवणुकीचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नसल्याची माहिती आहे.
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) हरियाणी गायिका आणि नृत्यांगना सपना चौधरीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. सपनाचे व्यवस्थापन करणाऱ्या एका सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीने तिच्या आणि तिच्या भावाविरुद्ध विश्वासघात, षड्यंत्र, फसवणूक आणि निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली होती.
अधिक वाचा : दहावीतील मुलाने केली 13 वर्षांच्या मित्राची हत्या
सपनाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये दावा करण्यात आला आहे की, तिने कलाकार व्यवस्थापन करार मोडला आहे, ज्यामध्ये ती इतर कोणत्याही कंपनीसोबत काम करणार नाही किंवा जॉइन करणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. कोणत्याही ग्राहकाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क नसेल.एफआयआरमध्ये हे नमूद करण्यात आले आहे की सपनाने कराराचे उल्लंघन केले आणि कराराच्या अटींविरुद्ध सपना वागल्याचे म्हटले आहे.