Ziva Dhoni Alleges Ranveer: महेंद्रसिंग धोनीची लेक झिवाने केला रणवीर सिंगवर ‘हा’ गोड आरोप

बी टाऊन
Updated Oct 09, 2019 | 16:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं सध्या क्रिकेटमधून ब्रेक घेतलाय. सध्या तो अनेकदा त्याच्या लेकीसोबत वेळ घालवताना दिसतो. धोनीने झिवाचा एक किस्सा नुकताच शेअर केला ज्यात रणवीर सिंगवर आरोप झालाय.

m s dhoni’s daughter ziva alleged ranveer singh of taking her glares 
Ziva Dhoni Alleges Ranveer: महेंद्रसिंग धोनीची लेक झिवाने केला रणवीर सिंगवर ‘हा’ गोड आरोप  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • महेंद्रसिंग धोनीची लेक झिवाने केला रणवीर सिंगवर आरोप
  • झिवा म्हणते रणवीरने घेतला तिचा गॉगल
  • धोनीने शेअर केली पोस्ट, त्यावर रणवीरची धमाल कमेन्ट

मुंबई: भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी शेवटचा क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसला तो २०१९च्या वर्ल्डकपमध्ये. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून तब्बल तीन महिन्यांचा ब्रेक घेतला आहे. त्यामुळे तो सध्या अनेकदा त्याच्या परिवारासोबत वेळ घालवताना दिसतो. खास करुन त्याची गोंडस लेक झिवा कायम त्याच्या पोस्टमध्ये दिसत असते. तिच्याबद्दल तो अनेकदा काही ना काही पोस्ट करताना दिसतो. नुकतीच त्याची झिवाबद्दलची अशीच एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे आणि त्यात बॉलिवूडचा सिम्बा म्हणजेज रणवीर सिंग देखील सामिल आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की धोनीच्या पोस्टमध्ये ते पण त्याच्या लेकीबद्दल असलेल्या, रणवीरचा काय संबंध? तर झालं आहे असं की झिवाकडे एक गॉगल आहे आणि तसाच गॉगल तिने रणवीरने घातलेला एका फोटोमध्ये पाहिला. ते पाहताच ही साडे चार वर्षांची चिमुरडी पटकन आपल्या बाबाला म्हणाली की हा तिचा गॉगल आहे. रणवीरने तिचा गॉगल का घातला आहे असा प्रश्न देखील झिवाने तिच्या बाबा धोनीला केला. त्यानंतर मात्र ती आपल्या रुममध्ये गेली आणि तिने आपला गॉगल शोधला. तिला तिचा गॉगल सापडताच ती पुन्हा एकदा धोनीला म्हणाली की तिचा गॉगल तिच्याकडे आहे. असा धमाल किस्सा होताच खुद्द धोनीनेच तो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला. त्याने या किस्साबद्दल लिहत रणवीर आणि झिवाचा सेम-टू-सेम गॉगल घातलेला एक कोलाज फोटो देखील शेअर केला.

 

 

या पोस्टमध्ये झिवाच्या या गोंडस किस्सासोबत त्याने असं सुद्धा लिहिलं आहे की आजकालची मुलं खूप वेगळी आहेत. मी साडे चार वर्षांचा असताना मला लक्षात पण नसतं की माझ्याकडे असा सारखाच गॉगल आहे ते. तसंच त्याने मिश्किलपणे हे सुद्धा लिहीलं आहे की त्याला खात्री आहे की पुढच्या वेळेस जेव्हा झिवा रणवीरला भेटेल तेव्हा ती त्याला सांगणार आहे की तिच्याकडे त्याच्यासारखाच गॉगल आहे ते. धोनीच्या या पोस्टवर खुद्द रणवीरने देखील कमेन्ट केलं आहे. त्याच्या कमेन्टमध्ये आधीतर तो खूप हसला आहे आणि मग झिवाला फॅशनिस्टा झी असं संबोधलं आहे.

धोनीचा हा किस्सा आणि त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर भलताच धुमाकूळ घालत आहे. त्याच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटीने सुद्धा कमेन्ट केलं आहे. तसंच क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने देखील यावर एक धमाल कमेन्ट केलं आहे. धोनीच्या इंस्टावर या पोस्टला अडीच लाखांच्या घरात लाईक्स मिळाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...