करण-मधुर जुगलबंदी

Madhur Bhandarkar requests Karan Johar to change the title of his upcoming show प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता निर्माता दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यात वाद सुरू आहे.

Madhur Bhandarkar requests Karan Johar to change the title of his upcoming show
करण-मधुर जुगलबंदी 

थोडं पण कामाचं

  • करण-मधुर जुगलबंदी
  • वेबसिरिजच्या नावावरुन सुरू झाला वाद
  • करणने त्याच्या वेबसिरिजचे नाव बदलावे, मधुरची मागणी

मुंबईः प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता निर्माता दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यात वाद सुरू आहे. एका वेबसिरिजच्या नावावरुन या वादाला सुरुवात झाली आहे. मधुरने या संदर्भात केलेल्या ट्वीटमुळे हा वाद चर्चेत आला आहे. आता हा वाद आणखी चिघळणार की लवकरच मिटवला जाणार यावरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काही जण मात्र हा करणने वेबसिरिजच्या जाहिरातबाजीसाठी घडवून आणलेला स्टंट असल्याची शक्यता व्यक्त करत आहेत. (Madhur Bhandarkar requests Karan Johar to change the title of his upcoming show)

सामाजिक आणि राजकीय विषयांवर सिनेमा निर्मिती करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मधुर भांडारकरने एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये मधुरने करण जोहरवर नावाच्या चोरीचा आरोप केला आहे. धर्मा प्रॉडक्शनचा करण जोहर आणि सीईओ अपूर्व मेहता हे दोघे काही काळापूर्वी भेटायला आले होते. यावेळी त्यांनी 'बॉलिवूड वाइव्स' या नावाचे हक्क विकत घ्यायची इच्छा व्यक्त केली होती. मात्र या नावाशी संबंधित कथेवर काम सुरू असल्यामुळे हक्क विकण्यास मी नम्र शब्दात नकार दिला. यानंतर करण आणि अपूर्वने त्यांची वेबसिरिज लाँच करण्यासाठी नावात चमत्कृती केली. त्यांनी 'फॅब्युलस लाइव्ह्ज ऑफ बॉलिवूड वाइव्स' अशा नावाने स्वतःची वेबसिरिज तयार केली आहे. वेबसिरिजच्या टायटलच्या निमित्ताने करण आणि अपूर्वने माझ्याकडे असलेल्या नावाची अप्रत्यक्षपणे चोरी केली, असा आरोप मधुरने केला. 

माझे काम अडचणीत सापडावे या हेतूने करणने नावाची अप्रत्यक्ष चोरी करण्याचा प्रकार केला, असा आरोप मधुर भांडारकरने केला. या प्रकरणी वाद आणखी वाढवण्याऐवजी स्वतःच्या वेबसिरिजचे नाव बदलावे, अशी नम्र विनंती मधुर भांडारकरने करण जोहर आणि अपूर्व मेहता या दोघांना केली आहे. मधुर भांडारकरने या प्रकरणात इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन यांच्याकडे करण जोहर आणि अपूर्व मेहताच्या धर्मा प्रॉडक्शन विरोधात तक्रार केली आहे. या संदर्भात इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन यांनी तातडीने मधुर भांडारकरला पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी 'फॅब्युलस लाइव्ह्ज ऑफ बॉलिवूड वाइव्स' या नावाचे हक्क अद्याप कोणत्याही वेबसिरिजसाठी हस्तांतरित केलेले नाही असे स्पष्टीकरण दिले. 

'फॅब्युलस लाइव्ह्ज ऑफ बॉलिवूड वाइव्स' ही वेबसिरिज २७ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यात नीलम कोठारी सोनी, अभिनेता समीर सोनी याची पत्नी सीमा खान, सोहेल खानची पत्नी सीमा कपूर, संजय कपूरची पत्नी महीप कपूर आणि चंकी पांडेची पत्नी भावना पांडे सहभागी आहेत. वेबसिरिज लाँच होण्यासाठी जेमतेम आठवडा उरला असताना नावावरुन वाद सुरू झाला आहे. 

नेटफ्लिक्स तसेच इतर अनेक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या 'फॅब्युलस लाइव्ह्ज ऑफ बॉलिवूड वाइव्स' या वेबसिरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा दोन मिनिटे आणि सोळा संकेदांचा व्हिडीओ आहे.

निर्माता दिग्दर्शक मधुर भांडारकरचे चित्रपट - रंगिला, त्रिशक्ती, चांदनी बार, सत्ता, आन : मेन अॅट वर्क, पेज थ्री, कॉर्पोरेट, ट्रॅफिक सिग्नल, फॅशन, जेल, दिल तो बच्चा है जी, हिरोईन, कॅलेंडर गर्ल्स, इंदू सरकार

निर्माता दिग्दर्शक करण जोहरचे चित्रपट - कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, कल हो ना हो, काल, कभी अलविदा ना कहना, दोस्ताना, कुरबान, वेक अप सिद, माय नेम इज खान, आय हेट लव्ह स्टोरीज, वी आर फॅमिली, अग्नीपथ, एक मै और एक तू, स्टुडंट ऑफ द इअर, बॉम्बे टॉकीज, गिप्पी, ये जवानी है दिवानी, गोरी तेरे प्यार मे, हसी तो फसी, टू स्टेट्स, हम्टी शर्मा की दुल्हनियां, उंगली, एआयबी नॉकआऊट, ब्रदर्स, शानदार, कपूर अँड सन्स, बार बार देखो, ए दिल है मुश्कील, डिअर जिंदगी, ओके जानू, बद्रीनाथ की दुल्हनियां, इत्तेफाक, लस्ट स्टोरीज, राझी, धडक, सिम्बा, केसरी, कलंक, स्टुडंट ऑफ द इअर २, ड्राइव्ह, गुड न्यूज, घोस्ट स्टोरीज, सूर्यवंशी, ब्रह्मास्त्र

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी