Madhuri Dixit Birthday: वाढदिवशी माधुरीचं प्रेक्षकांसाठी खास गिफ्ट

बी टाऊन
Updated May 15, 2020 | 19:30 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Madhuri Dixit Birthday: धक-धक गर्ल माधुरी आज आपला वाढदिवस साजरा करतेय. तिनं वाढदिवसानिमित्त फॅन्सना एक खास गिफ्ट दिलं आहे. अभिनय आणि नृत्यासोबतच आता माधुरी गाणं गाणार आहे.

Madhuri Dixit
वाढदिवशी माधुरीचं प्रेक्षकांसाठी खास गिफ्ट, लवकरच येतंय गाणं  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • माधुरी दीक्षित साजरा करतेय आज तिचा वाढदिवस
  • माधुरी दीक्षितनं सोशल मीडियावर शेअर केला एक व्हिडिओ
  • माधुरीनं सांगितलं लवकरच तिनं गायलेलं गाणं प्रेक्षकांसमोर आणणार

मुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आज आपला वाढदिवस साजरा करतेय. सकळापासूनच सेलिब्रेटी आणि फॅन्स तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आता माधुरीनं आपल्या फॅन्सना एक खास गिफ्ट दिलंय. माधुरी लवकरच गाण्यात आपलं नशीब आजमावणार आहे.

माधुरी दीक्षितनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये माधुरीनं सांगितलं की, ती लवकरच आपलं पहिलं गाणं घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. तिनं या गाण्याची पहिली झलक पण सोशल मीडियावर शेअर केलीय.

माधुरीनं हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं, ‘बर्थडेवर आपण दिलेल्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छाबद्दल धन्यवाद! मी आपल्यावर काही प्रेम करत करू इच्छित आहे. मी आपल्या पहिल्या गाण्याची झलक आपल्यासोबत शेअर करतेय.’

हे असेल गाण्याचं नाव

माधुरी दीक्षितनं सोशल मीडियावर गाण्याचं नाव पण सांगितलं आहे. माधुरीनं लिहिलं, ‘लवकरच आपल्यासोबत मी नवीन गाणं शेअर करेल. याचं नाव आहे कँडल. या गाण्यात तिनं आशेबद्दल सांगितलं आहे. सध्या सर्वांना याची सर्वाधिक गरज आहे.’

आपल्याला माहितीच आहे माधुरी दीक्षितनं यापूर्वी I for India कॉन्सर्टमध्ये गाणं गायलं होतं. माधुरी दीक्षितनं हॉलिवूड सिंगर एड शीरनचं गाणं गायलं होतं. तर तिच्या मुलानं पियानो वाजवला होता. माधुरीनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता.

शेअर केला होता डान्स व्हिडिओ

माधुरी दीक्षितनं आपल्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये तिचा मोठा मुलगा अरिन तबला वाजवतांना दिसतोय. तर माधुरी आपल्या पायांमध्ये घुंगरू बांधून नाचतांना दिसतेय. यानंतर ती अरिनला पण काही डान्स स्टेप्स शिकवतांना दिसतेय.

माधुरी आणि अरिनचा हा व्हिडिओ तिच्या फॅन्सना खूप आवडतोय. हा व्हिडिओ शेअर करत माधुरीनं लिहिलं, ‘क्वारंटाइन आपल्याला ते सर्व करण्याची संधी देत आहे, जे आपल्याला नेहमीच करायचं होतं. व्हिडिओ अखेरपर्यंत पाहा आणि जाणून घ्या की, मला काय करायचं होतं.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी