Madhuri Dixit Mother Passed Away : अभिनेत्री माधुरी दीक्षितची (Madhuri Dixit) आई स्नेहलता दीक्षित (Snehlata Dixit) यांचे आज निधन झाले आहे. अभिनेत्री माधुरीची आई स्नेहलता यांचं आज सकाळी 8.40 वाजता वृद्धापकाळाने त्यांचे निधन झालं. त्यांनी वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. स्नेहलता यांच्या पार्थिवावर मुंबईत दुपारी अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. आज दुपारी 3 वाजता वरळी येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार (funeral) करण्यात येणार आहेत.
अधिक वाचा :ज्योतिष शास्त्र: या ग्रहांच्या दोषामुळे हृदयविकाराचा झटका येतो
आई स्नेहलता यांच्या निधनानं माधुरी आणि त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने यांच्या आई स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी निधन झालं, याची माहिती माधुरी दीक्षितचे नातेवाईक रिक्कू राकेश नाथ यांनी दिली. माधुरीसाठी तिची आई एक जिवलग मैत्रिण होती. आयुष्यातील प्रत्येक वळणावर तिला आई स्नेहलता यांची साथ लाभली. त्यामुळे आईच्या निधनाने माधुरीच्या आयुष्यात न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे.
अधिक वाचा : पोरं अभ्यास करत नसतील तर पालकांनो करा या गोष्टी
त्यानंतर माधुरी दीक्षितनं ही दु:खद बातमी शेअर केली आहे. माधुरीने सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहीलं आहे, माझी प्रिय आई स्नेहलता दीक्षित यांचं आज सकाळी निधन झालंय. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबई येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.