अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांच्यासोबत काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन

हिंदी सिनेसृष्टीला आज आणखी एक धक्का बसला. एका ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले.

Mahabharata actor Satish Kaul passes away at 73 after fighting Covid-19
अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांच्यासोबत काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन 

थोडं पण कामाचं

  • अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांच्यासोबत काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन
  • ज्येष्ठ अभिनेते सतीश कौल (७३) यांचे निधन
  • हिंदी सिनेसृष्टीला आणखी एक धक्का

मुंबईः हिंदी सिनेसृष्टीला आज आणखी एक धक्का बसला. महानायक अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांच्यासोबत काम केलेले ज्येष्ठ अभिनेते सतीश कौल (७३) यांचे निधन झाले. सतीश कौल यांना कोरोना या संसर्गजन्य आजाराची बाधा झाली होती. काही दिवसांपासून ते आजारी होते. उपचार सुरू असताना तब्येत खालावली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. (Mahabharata actor Satish Kaul passes away at 73 after fighting Covid-19)

सतीश कौल यांच्या निधनाचे वृत्त कळताच जुन्या पीढीच्या अनेकांनी शोक व्यक्त केला. सतीश कौल यांनी बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत' या टीव्ही मालिकेत 'इंद्रदेव' ही भूमिका साकारली होती. मागील काही काळापासून ते आर्थिक समस्येने त्रस्त होते. औषधे आणि आवश्यक वस्तू घेण्यासाठीही सतीश कौल यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. अशातच त्यांना कोरोना झाला. कोरोना झाल्यामुळे तब्येत खालावली आणि सतीश कौल यांची प्राणज्योत मालवली. 

सतीश कौल २०११ मध्ये मुंबईहून पंजाबमध्ये लुधियाना येथे गेले. तिथे भाड्याच्या घरात राहून ते मनोरंजनसृष्टीत काम मिळवण्याचा प्रयत्न करत होते. वयोमानामुळे पंजाबच्या मनोरंजनसृष्टीतही काम मिळणे कठीण झाले. अशातच २०१५ मध्ये सतीश कौल यांना गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्यांना अडीच वर्ष हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. मागील काही काळापासून ते एका वृद्धाश्रमात होते. 

सतीश कौल यांची कारकिर्द

सतीश कौल यांनी पंजाबी आणि हिंदी अशा ३०० पेक्षा जास्त सिनेमात काम केले. पण वृद्धापकाळात आर्थिक नियोजनाअभावी कौल यांना रेशनचे सामान खरेदी करणेही कठीण झाले. ते मागील काही दिवसांपासून ओळखीच्या लोकांकडून पैशांच्या रुपाने मदत मिळावी यासाठी प्रयत्न करत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी