Ranbir Alia marriage : महेश भट्ट यांनी जावई रणबीरच्या नावाची काढली मेहंदी, तर रणबीरच्या हातावर आलियाचे नाव

बी टाऊन
Updated Apr 16, 2022 | 19:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mahesh Bhatt mehendi: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकमेकांचे झाले आहेत. या दोघांचे आतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Mahesh Bhatt wrote name of his son-in-law Ranbir in Mehndi, while Ranbir wrote Alia's name
आलिया-रणबीर अडकले लग्नबंधनात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकमेकांचे झाले आहेत.
  • रणबीरनेही हातावर मेहंदी काढून आलियाचे नाव लिहिले आहे.
  • महेश भट्ट यांनीही रणबीरच्या नावासह हातावर मेहंदी काढली

Mahesh Bhatt mehendi: चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि क्यूट गर्ल आलिया भट्ट एकमेकांचे झाले आहेत. गुरुवारी रणबीर कपूरच्या घरी वास्तु अपार्टमेंटमध्ये दोन्ही स्टार्सच्या लग्नाचे विधी पार पडले. लग्नानंतर दोन्ही स्टार्स बाहेर आले आणि मीडियाशी संवाद साधला. त्याआधी आलिया भट्टने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाच्या विधींचे फोटो शेअर केले होते. या दोघांचे आतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


आलिया आणि रणबीरच्या लग्नाचा प्रत्येक फोटो खूप खास होता. हे फोटो पाहून असे म्हणता येईल की, जेव्हा प्रेम पूर्ण होते, तेव्हा किती आनंद होतो.  आलिया आणि रणबीरच्या लग्नामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आलियाची आई सोनी राजदान आणि वडील महेश भट्ट खूप खुश होते. 
महेश भट्ट यांनी आपल्या मुलीच्या आनंदासाठी अनेक गोष्टी केल्या.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ETimes (@etimes)


महेश भट्ट अनेकदा काळ्या पोशाखात दिसतात पण त्यांच्या मुलीच्या लग्नात त्यांनी थीम असलेली रंगीत शेरवानी घातली होती. इतकंच नाही तर महेश भट्ट यांनी रणबीरच्या नावासोबत हातावर मेहंदीही काढली. मुलीच्या लग्नानंतर महेश भट्ट जेव्हा भावूक झाले तेव्हा जावई रणबीर कपूरने त्यांना मिठी मारली. हा फोटो सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ETimes (@etimes)


रणबीरने आलियाचे नाव लिहिले


आलिया भट्टच्या हातावर केवळ रणबीर कपूरच्या नावाची मेंदी नाही तर रणबीरनेही हातावर मेहंदी काढून आलियाचे नावही लिहिले आहे. रणबीर आणि आलिया मीडियासमोर पोज देण्यासाठी आले तेव्हा त्याच्या हातावर मेहंदीने लिहिलेले आलियाचे नाव स्पष्ट दिसत होते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ETimes (@etimes)


फॅमिली फोटो 

रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाचे नवीन फोटो समोर आले आहेत ज्यात नवविवाहित आलिया रणबीर कुटुंबासोबत पोज देताना दिसत आहे.  फोटोंमध्ये दोघांचे कुटुंब वधू-वरांना आशीर्वाद देत आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी