Malaika Arora and Arjun Kapoor : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार?, मलायकाने केला मोठा खुलासा

बी टाऊन
Updated Nov 10, 2022 | 15:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Malaika Arora and Arjun Kapoor : मलायका अरोराने (Malaika Arora) नुकतीच तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, या पोस्टमध्ये मलायका अरोराने लग्नाचा इशारा दिल्याचं म्हणता येईल. ही बातमी ऐकून चाहते आणि स्टार्स खूप उत्सुक आहेत. बी-टाऊनचे कलाकारही मलायका आणि अर्जुन कपूरचे (Arjun Kapoor) अभिनंदन करत आहेत.

Malaika arora and arjun kapoor to get marry soon
मलायका-अर्जुनचा शुभविवाह?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार
  • मलायका अरोराच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण
  • बॉलिवूडमधूनही मलायकाच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव

Malaika Arora and Arjun Kapoor : मलायका अरोराने (Malaika Arora) नुकतीच तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, या पोस्टमध्ये मलायका अरोराने लग्नाचा इशारा दिल्याचं म्हणता येईल. ही बातमी ऐकून चाहते आणि स्टार्स खूप उत्सुक आहेत. बी-टाऊनचे कलाकारही मलायका आणि अर्जुन कपूरचे (Arjun Kapoor) अभिनंदन करत आहेत. (Malaika arora and arjun kapoor to get marry soon)


मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये आहेत. आता या नात्याला नवीन नाव देण्याचा विचार दोघेही करत आहेत. यापूर्वी दोघेही पॅरिसला व्हेकेशनसाठी गेले होते.त्याचवेळी या दोघांनीही त्यांच्या भविष्याचा विचार केला असावा अशी अपेक्षा आहे. लवकरच दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या लग्नाची बातमी ऐकून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट पोस्ट शेअर केली आहे, या पोस्टमुळे मलायका आणि अर्जुन लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

अधिक वाचा : पन्नाशीच्या उंबरठ्यावरही ऐश्वर्याला ‘या’ गोष्टी ठेवतात तरुण


10 नोव्हेंबरला मलायका अरोराने एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने स्‍वत:चा लाजतानाचा फोटो शेअर केल्‍याचे पाहायला मिळत आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "मी हो म्हटले आहे". मलायकाने तिच्या लग्नाबाबत अर्जुन कपूरला हो म्हटलं आहे यात शंका नाही. मलायका आणि अर्जुनचे चाहते आणि स्टार्सनी या दोघांचं जोरदार अभिनंदन केले आहे. ही बातमी ऐकून अभिनेता पुलकित सम्राट खूप उत्साहित झाला. त्याचबरोबर माही विज, डब्बू रतलानी, शमिता शेट्टी यांनीही कमेंट करून या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.

काही दिवसांपूर्वीच हे कपल व्हेकेशनवर गेलेले होते. या दोघांनीही आपल्या प्रेमाचा चाहत्यांसमोर स्वीकार केला होता. एवढंच नाही तर 'कॉफी विथ करण'मध्येही अर्जुन कपूरने मलायका आणि त्याच्या नात्याचा स्वीकार केला होता. या दोघांनी आपलं नात लपवलं नव्हतं. "मी लाजत नाही, आणि मी कधीच काही लपवतही नाही. करिअरमध्येही मला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. जेणेकरून मी माझ्या लाईफ पार्टनरला खुश ठेवू शकेन" 

अधिक वाचा : 'बिग बॉस'च्या घरातून 'या' सदस्याची हकालपट्टी?

या आधी मलायकाचे लग्न तुटलेले आहे. 

मलायका अरोरा आणि बॉलिवूड अभिनेता अरबाज खान यांनी 1998 मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या 18 वर्षानंतर मलायका आणि अरबाजने 2017 मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मलायका आणि अरबाजला मुलगासुद्धा आहे. ज्याचे नाव अरहान खान आहे. मात्र, घटस्फोटानंतर दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. मलायका अर्जुनला डेट करत आहे. तर अरबाजही जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशीपमध्ये आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी