malaika arora bollywood actress first photo of her accident scar near her eye : मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या डोळ्याला जखम झाली होती. मलायकाच्या कारला २ एप्रिल २०२२ रोजी पुण्याहून मुंबईला येताना खोपोलीजवळ एक्सप्रेस वे वर अपघात झाला होता. या अपघातात मलायकाच्या डोळ्याला जखम झाली होती.
हरनाज संधूने सर्व मर्यादा ओलांडल्या, कॅमेरासमोर ओलांडली बोल्डनेसची हद्द
वेळेत वैद्यकीय उपचार झाले, प्रकृती स्थिर होईपर्यंत मलायका डॉक्टरांच्या देखरेखीत हॉस्पिटलमध्ये होती. यामुळे डोळ्याजवळ झालेली जखम बरी होण्याच्या मार्गावर आहे. मलायका अपघाताच्या धक्क्यातून सावरत आहे.
अपघातामुळे डोळ्याला झालेल्या जखमेची माहिती देण्यासाठी मलायकाने एक इन्स्टा पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मलायकाने फोटो पोस्ट करुन घटनेची माहिती आणि तिचा अनुभव थोडक्यात नमूद केला आहे. फोटोत मोठा काळा गॉगल घातलेली मलायका दिसत आहे. गॉगलजवळ मलायकाच्या डोळ्याला झालेली इजा दिसत आहे. ही इजा कपाळावरून डोळ्याच्या वरील भागाच्या दिशेने आयब्रोच्यामध्ये अशा स्वरुपाची आहे.
इन्स्टा पोस्टमध्ये दिलेल्या माहितीत मलायकाने अपघाताविषयी थोडक्यात सांगितले आहेत. अपघात हा आयुष्यातील सर्वात मोठा शारीरिक आणि मानसिक धक्का होता, असे मलायका म्हणाली. सिनेमात अपघात दाखवतात आणि अपघातानंतर रक्त येताना दिसतं. पण मी प्रत्यक्ष अपघात अनुभवला. हे विसरणे कठीण आहे; असे मलायकाने पोस्टमध्ये नमूद केले आहे.
आपण जीवंत आहोत की नाही हे समजत नव्हते. डोकं ठणकत होते. डोक्याला मार लागला होता. रक्त वहात होते. पण नेमके काय झाले आहे हे समजत नव्हते. जोरदार धक्का बसला एवढे आठवते. नंतर हॉस्पिटलमधील धावपळ आठवत आहे. हॉस्पिटलमध्येच मला शुद्ध आली; असे मलायकाने सांगितले.