Malaika Arora Compared to Shehnaaz Gill: मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या लूकमुळे ती खूप चर्चेत असते. अभिनेत्री अलीकडेच एका फॅशन शोमध्ये शोस्टॉपर म्हणून दिसली. पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी अभिनेत्रीने रॅम्पवर जबरदस्त डान्स केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.मलायका अरोराच्या या डान्स स्टेप्स तिच्या चाहत्यांना खूप आवडल्या. तर काहींनी मलायकाने शहनाज गिलची कॉपी केल्याचंही म्हटलं आहे.
रॅम्पवर डान्स करून शहनाजने चाहत्यांची खूप वाहवा मिळवली होती. (Malaika arora dance on ramp during fashion show video viral)
अधिक वाचा : 'बिग बॉस मराठी सीझन 4'चा प्रीमियर पाहा Online
मलायकाने डिझायनर गोपी वैद्यच्या लेहेंगामध्ये रॅम्प वॉक केला. अभिनेत्रीने टिका आणि बांगड्या घालून तिचा लूक पूर्ण केला. पारंपारिक लूकमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे.
तिने इतर मॉडेल्ससोबत रॅम्पवर अप्रतिम डान्स केला.
मलायकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका चाहत्याने लिहिले की, "मला तिच्या चेहऱ्यावरील भाव आणि नृत्य आवडले. काही यूजर्सनी मलायकाच्या डान्स व्हिडिओची तुलना शहनाज गिलशी केली आणि लिहिले, "शहनाजला पाहून आता सर्वजण रॅम्पवर डान्स करतील." आणखी एका यूजरने लिहिले की, "प्रत्येक टीव्ही आणि बॉलीवूड अभिनेत्याला शहनाज गिल व्हायचे आहे पण शहनाज गिल एकच आहे आणि ती सिंहीण आहे."
अधिक वाचा : Navratri 9 colors 2022: उद्याचा रंग- (केशरी), द्या शुभेच्छा
या वर्षी जूनमध्ये फॅशन वीकमध्ये शहनाज गिलने रॅम्प वॉक करून पदार्पण केले. लाल रंगाच्या लेहेंग्यात अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती आणि दिवंगत गायक सिद्धू मूस वालाच्या गाण्यावर तिने जबरदस्त डान्स केला. या अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
मलायका तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. स्मॉल स्क्रीनवर इंडियाज बेस्ट डान्सर या डान्स रिएलिटी शोमध्ये मलायका जजच्या भूमिकेत होती. मलायका छैय्या, छैय्या, मुन्नी बदनाम हुई, अनारकली डिस्को चली यासारख्या हीट गाण्यांसाठी ओळखली जाते.