Malaika Arora Trolled on Outfit । मुंबई : मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर तिच्या आउटफिट्सचे (Malaika Arora outfits) नेहमी अनेक प्रयोग करत असते. यामुळे ती अनेकवेळा ट्रोलर्सच्या निशाण्यावरही आली आहे. मलायका नुकतीच तिचा मुलगा आणि बहीण अमृता अरोरासोबत कॅमेऱ्यासमोर आली. यादरम्यान तिला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल केले जात आहे. (Malaika Arora is once again becoming a troll because of her outfits).
अधिक वाचा : हेल्टेमशिवाय बाईक चालवत होता पोलिस, पाहा पुढे काय घडले
दरम्यान, मलायका अरोरा तिचा मुलगा अरहान खान आणि बहीण अमृता अरोरासोबत ब्रंचसाठी रेस्टॉरंटमध्ये गेली होती. यावेळी अरहानने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि हिरव्या रंगाचा जॉगर्स घातला होता. तर अमृता अरोरा हिने पांढऱ्या रंगाचा कोट-पँट आणि मॅचिंग कलरचे स्नीकर्स घातले होते. यादरम्यान सर्वांच्या नजरा मलायका अरोराच्या आउटफिटवर लागल्या होत्या. मलायका अरोरा हिने ब्लू कलरचा ओव्हरसाइज स्ट्रीप शर्ट घातला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मलायका या कपड्यांवरून ट्रोल होऊ लागली आहे. ट्रोलर्स पॅंट कुठे आहे अशा शब्दांत तिच्यावर निशाणा साधत आहेत.
मलायका अरोराच्या या व्हिडीओमध्ये चाहते तिला तिच्या पॅंटबद्दल विचारणा करत आहेत. एका युजरने गंमतीत लिहिले की, 'तिला कोणीतरी काही पॅंट द्या.' त्याचवेळी दुसऱ्या युजरने म्हटले की, 'हे लोक फक्त शर्ट घालूनच निघून जातात का?' मात्र, ट्रोलर्सच्या कमेंट्सची पर्वा न करता मलायका तिच्या लूकवर नेहमी वेगवेगळे प्रयोग करत राहते. सोशल मीडियावर कोणी काय कमेंट करते, याने तिला अजिबात फरक पडत नाही, असे तिने तिच्या अनेक मुलाखतींमध्ये उघडपणे सांगितले आहे.
लक्षणीय बाब म्हणजे मलायका अरोरा नुकतीच करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाला उपस्थित होती. यादरम्यान देखील तिला आउटफिटमुळे ट्रोल करण्यात आले होते. मलायका अरोराने हिरव्या ओव्हरसाईज जॅकेट आणि शॉर्ट्ससह बिकिनी टॉप घातला होता. तिने हाय-प्लॅटफॉर्म सँडल देखील घातला होता.