Malaika Arora Item Dance: 'अ‍ॅक्शन हिरो' सिनेमात मलायकाचे आयटम साँग, 'आप जैसा कोई मेरी...' म्हणत सिझलिंग परफॉर्मन्स

बी टाऊन
Updated Nov 27, 2022 | 20:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Malaika Arora Dance: आयुष्मान खुराना (Aaushyaman Khurana) स्टारर 'अ‍ॅक्शन हिरो' मधील 'आप जैसा कोई...' हे गाणे नुकतच रिलीज झालं आहे. हा सिनेमा पुढील महिन्यात रिलीज होणार आहे. मलायका अरोराचा (Malaika Arora) हा आयटम डान्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Malaika Arora Item Dance in An Action hero movie
मलायका अरोराचे आयटम साँग  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मलायका करणार सिल्व्हर स्क्रीनवर पुनरागमन
  • अ‍ॅक्शन हिरो सिनेमात मलायकाचे आयटम साँग
  • आयुष्यान खुराना मलायकासोबत थिरकणार

Malaika Arora Dance: आयुष्मान खुराना (Aaushyaman Khurana) स्टारर 'अ‍ॅक्शन हिरो' मधील 'आप जैसा कोई...' हे गाणे नुकतच रिलीज झालं आहे. हा सिनेमा पुढील महिन्यात रिलीज होणार आहे. मलायका अरोराचा (Malaika Arora) हा आयटम डान्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. (Malaika Arora Item Dance in An Action hero movie)

अधिक वाचा : एअरटेलने दणकून वाढवले प्रीपेड प्लॅनचे शुल्क

मलायका अरोरा (Malaika Arora) चार वर्षांनंतर सिल्व्हर स्क्रीनवर पुनरागमन करत आहे. 'आप जैसी कोई मेरी जिंदगी में आये' हे मलायकाचं आयटम साँग नुकतच रिलीज झालं. 1980 च्या कुर्बानी सिनेमातील हे गाणे आयुष्मान खुराना (Aaushyaman Khurana) स्टारर सिनेमा 'अ‍ॅक्शन हिरो'साठी पुन्हा तयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये मलायकाचा डान्स पाहायला मिळत आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर तासाभरात त्याचे व्ह्यूज लाखोंपर्यंत पोहोचले आणि मलायकाच्या स्टाईलने लोकांना घायाळ केले. या गाण्यात आयुष्मान खुरानाही मलायकासोबत थिरकताना दिसत आहे.  जयदीप अहलावतही या सिनेमात आहे. 


ग्लॅमरस आणि हॉट अंदाज

अर्जुन कपूरसोबतची जवळीक, जिम आणि बॉलीवूड पार्ट्यांच्या भेटीदरम्यान पापाराझीच्या फोटोंमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मलायका अरोराचे चाहते तिच्या सिल्व्हर स्क्रीनवरील पुनरागमनाबद्दल उत्सुक आहेत. छैय्या छैय्यापासून मुन्नी बदनाम हुईपर्यंत अनेक सिनेमांमध्ये आपल्या आयटम डान्सने धमाल केलेली मलायका चार वर्षांनंतर सिल्व्हर स्क्रीनवर पुनरागमन करत आहे. या गाण्यात मलायकाचा ग्लॅमरस आणि हॉट स्टाईल चाहत्यांना आकर्षित करत आहे. कुर्बानी सिनेमात हे गाणे झीनत अमानवर शूट करण्यात आले होते आणि आजही प्रेक्षक त्याची आठवण करतात. हे गाणे तनिष्क बागचीने 'एन अ‍ॅक्शन हिरो' साठी पुन्हा तयार केले आहे आणि झारा एस खान आणि अल्तमश फरीद यांनी गायले आहे.

अधिक वाचा : आगामी 2023 मध्ये वर्षभर आहे, लॉंग वीकेंडची धूम, करा प्लॅनिंग

'एन अ‍ॅक्शन हिरो'2 डिसेंबरला रिलीज होत आहे. या सिनेमात छैय्या छैय्या गर्ल देखील बॉलिवूडची आयटम डान्सर म्हणून दिसणार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार तर ती आयटम नंबरमध्येही छोटी भूमिका करताना दिसणार आहे. एका सिनेमाच्या सेटवर ती मलायका अरोराच्या भूमिकेत काही दृश्यांमध्ये शूटिंग करत असल्याचा सिक्वेन्स सिनेमात आहे. 49 वर्षीय मलायका तिच्या दबंगमधील मुन्नी बदनाम, हाऊस फुल 2 मधील अनारकली डिस्को चली आणि कांटे के माही वे यांसारख्या आयटम नंबरसाठी प्रसिद्ध आहे, परंतु आजही शाहरुख खानच्या दिल से सिनेमातील  छैय्या छैय्या हा मलायकाचा डान्स हिट आहे. आता सिनेमातील मलायकाचा हा डान्स सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी फायदेशीर ठरणार का तेच पाहायचं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी