मलायका अरोराने शेअर केला असा फोटो, लोक म्हणाले - अंडरआर्म वॅक्स तरी करायचे

बी टाऊन
Updated May 29, 2019 | 14:28 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअऱ केला आहे. या फोटोद्वारे लोक तिच्या अंडरआर्म्सवरून कमेंट करत आहेत. या फोटोवरून त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.

malaika arora
मलायका अरोरा  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: एखाद्या बॉलिवूड कलाकाराला सोशल मीडियावर ट्रोल केले जाणे ही काही नवी गोष्ट नाही. सेलिब्रेटींना अनेकदा कोणत्या ना  कोणत्या कारणामुळे ट्रोल होत असतात. सेलिब्रेटींना त्यांच्या लूक्सपासून ते त्यांची स्टाईल तसेच त्यांचे वाढते वय यावरूनही लोकस सोशल मीडियावर ट्रोल करतात. नुकतेच सुंदर अभिनेत्री मलायका अरोराला सोशल मीडियावर तिच्या एका फोटोवरून ट्रोल केले जात आहे.

खरंतर मलायकाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये मलायका अतिशय सुंदर दिसत आहे. मात्र ट्रोलर्सनी या फोटोवरून अभिनेत्रीला ट्रोल केले आहे. मलायकाने शेअर केलेल्या फोटोत तिचे अंडरआर्म्स दिसत आहेत. तिच्या अंडरआर्म्सचे केस या फोटोत दिसत असल्याने त्यावरून लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. लोक सातत्याने तिच्या पोस्टवर कमेंट करून तिला कमीत कमी वॅक्स करण्याचा सल्ला देत आहे. 

एका युजरने मलायच्या फोटोवर कमेंट करताना म्हटले, आंटी जी वॅक्स करना भूल गई. एका युजरने म्हटले, अंडरआर्म्स वॅक्स तरी करायचे. तर काहींनी विचारले की तिच्याकडे इतकाही वेळ नाही की ती अंडरआर्म्स वॅक्स करू शकत नाही. दरम्यान, या फोटोवर केवळ निगेटिव्ह कमेंटच येत नाही आहेत तर काहींनी तिच्या लूकचे कौतुकही केले आहे. काही फॅन्सच्या मते तिचा हा फोटो खूप सुंदर दिसत आहेत. तर काहींना तिचा हा फोटो हॉट दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#bts....

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मलायकाची गणना अशा अभिनेत्रींच्या यादीत होते जिला सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रोल केले जाते. मात्र मलायने आपल्या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करून त्यांना सडेतोड उत्तर देते. मलायका आपले बोल्ड फोटो शेअर करत ट्रोलर्सला नेहमी उत्तर देते. मलायला बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे गेल्या काही दिवसांपासून चांगलीच ट्रोल होत आहे. 

नुकतीच अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबतच्या नात्यावर मोठा खुलासा केला. अर्जुनने आपल्या इंडियाज मोस्ट वाँटेड या सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान मलायकासोबत कपल पोझही दिली. यानंतर आपल्या नात्याबद्दल त्यांने खुलेपणाने विधान केले. दरम्यान, अर्जुन आणि मलायकाच्या या फोटोवरून लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केले. अनेकांनी मलायकाची तुलना श्रीदेवीशी केली. त्यामुळे अर्जुन चांगलाच भडकला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मलायका अरोराने शेअर केला असा फोटो, लोक म्हणाले - अंडरआर्म वॅक्स तरी करायचे Description: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअऱ केला आहे. या फोटोद्वारे लोक तिच्या अंडरआर्म्सवरून कमेंट करत आहेत. या फोटोवरून त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.
Loading...
Loading...
Loading...