सोशल मीडियावर उडवण्यात आली मलायका अरोराच्या मुलाची खिल्ली, असे केले कमेंट 

बी टाऊन
Updated Jun 25, 2019 | 18:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलीवडू अभिनेत्री मलायका अरोरा नुकतीच आपला मुलगा अरहानसोबत दिसली होती. या संदर्भातील काही फोटो सोशल मीडियावर आले होते, त्यानंतर काय झाले ते तुम्हांला माहिती आहे... ट्रोल... ट्रोल आणि ट्रोलच.... 

Malaika Arora spotted with Son Arhaan
मलायका अरोरा आणि अरहान खान  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा बॉलिवूडमधील सर्वात फीट अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमी जीममध्ये जाताना स्पॉट होते. आपल्या फिटनेस सोबत मलायका सुंदरता आणि बोल्ड अंदाजासाठी ती ओळखली जाते. मलायका फोटो पोस्ट करते आणि त्यानंतर ट्रोलर्स तिला ट्रोल करत असतात. 

सोशल मीडियावर सेलिब्रिटी आणि त्यांच्या मुलांना ट्रोल करणे आता सर्वसाधरण घटना बनली आहे. नुकतेच मलायकाचे फोटो समोर आले आहेत. त्यात ती आपला मुलगा अरहानसोबत दिसत आहे. या फोटोवरून सोशल मीडियावर मलायका आणि अरहानची खिल्ली उडवली जात होती. फोटोमध्ये मलायका ब्लॅक टॉप आणि ऑरेंजमध्ये बॉटम वेअरमध्ये दिसते आहे. तर अरहानने ब्लू आणि ग्रे टी शर्टसोबत ग्रे शॉर्ट परिधान केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#malaikaarora snapped with son #arhaankhan #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

या फोटोवरून  मलायका आणि अरहान दोघांची खिल्ली उडविण्यात आली आहे. मलायकाला तिच्या वयावरून तसेच अर्जुन कपूरशी असलेल्या संबंधावरून नेहमी ट्रोल केले जाते. आता अरहानला आता मुलगी म्हणून चिडवत आहेत. अनेकांनी कमेंट करून विचारले की, हा मुलगा आहे की मुलगी. तर काहींनी त्याच्या लांब केसांवरही टीका करत आहे. तर दुसरीकडे काही लोक मलायकाची मस्करी करत आहेत. तिला आंटी म्हणून चिडवत आहेत. अनेकांनी विचारले की मलायका कायम सलून बाहेर का असते.

अरहानला पहिल्यांदाच  सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले नाही.  यापूर्वीही त्याला ट्रोल करण्यात आले आहे. या शिवाय अक्षय कुमार याचा मुलगा आरव, अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अनेक स्टार किड्सची मस्करी करण्यात आली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सोशल मीडियावर उडवण्यात आली मलायका अरोराच्या मुलाची खिल्ली, असे केले कमेंट  Description: बॉलीवडू अभिनेत्री मलायका अरोरा नुकतीच आपला मुलगा अरहानसोबत दिसली होती. या संदर्भातील काही फोटो सोशल मीडियावर आले होते, त्यानंतर काय झाले ते तुम्हांला माहिती आहे... ट्रोल... ट्रोल आणि ट्रोलच.... 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola