मलायकानं करिनासोबत पार्टीचे फोटो केले शेअर, ट्रोलर्सने म्हटलं - अर्जुन कुठे लपलाय?

बी टाऊन
Updated Apr 20, 2019 | 13:53 IST | टाइम्स नाऊ हिंदी

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरानं नुकताच आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ज्यात ती आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत दिसतेय. या फोटोमध्ये अर्जुन कपूर दिसत नाहीय, त्यामुळं तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय.

Malaika arora with BFF
मलायका अरोराची टेरेस पार्टी  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: अभिनेत्री मलायका अरोराचं काही काळापासून अभिनेता अर्जुन कपूर सोबत नाव जोडलं जात आहे. तर दुसरीकडे घटस्फोटानंतर मलायका आपलं आयुष्य आनंदात जगतांना दिसत आहेत. ती नेहमी सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करते आणि ट्रोलर्स नेहमीच तिला ट्रोल करण्याची संधी सोडत नाहीत.

नुकताच मलायकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मलायका आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत दिसत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री करिना कपूर, अमृता अरोरा आणि तिचा नवरा शकील लडक इतसेच आणखी काही मित्र-मैत्रिणी दिसत आहेत. हा फोटो शेअर करतांना मलायकानं लिहिलंय, ‘समर नाईट्स... टेरेस नाईट्स’. मलायकानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये अर्जुन कपूर मात्र दिसत नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलर्स मलायकाला अनेक प्रश्न विचारत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Summer nights .... terrace nights @amuaroraofficial @shaklad @vahbizmehta @delnazd @mallika_bhat @vikramphadnis #bebo#ammusrerrace

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मलायकाच्या या फोटोवर फॅन्सने तिची स्तुती पण केली आहे. अनेक चाहत्यांनी लिहिलं की, मलायका या फोटोत खूप सुंदर दिसत आहे. तर काहींनी लिहिलं मलायकाचं सौंदर्य दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. तर काही जण अर्जुन कपूरचं नाव घेत मलायकाला ट्रोल करत आहेत. लोकांनी तिच्या फोटोवर कमेंट करत लिहिलं की, या फोटोमध्ये अर्जुन कुठे लपलाय? तर अर्जुन कुठे आहे? असा प्रश्न एकाने विचारला. अर्जुन कुठे हरवला? अर्जुन दिसत नाहीय? असे प्रश्न सुद्धा ट्रोलर्स विचारत आहेत.

काही काळापासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. अनेक ठिकाणी या दोघांना एकत्र पाहिलं गेलंय. मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीच्या लग्नातही अर्जुन-मलायका एकत्र पोहोचले होते. याशिवाय अनेकदा त्यांना एकत्र स्पॉट केलं गेलं. नुकतीच मलायका मालदिवला सुट्ट्या एंजॉय करून आली, यादरम्यानही तिच्या फोटोंवर कमेंट करत यूजर्सनी अर्जुन कुठे आहे? असे प्रश्न विचारले होते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Malla and Arjun post dinner date at Hakkassan .♥️♥️. . Follow @top_filmyy for more

A post shared by TopFilmy (@top_filmyy) on

नंतर अर्जुन कपूर यानंही आपले मालदिवचे फोटो शेअर केले होते. तेव्हा हे दोघं एकत्र मालदिवमध्ये सुट्ट्यांसाठी गेले होते, असं मानलं गेलं. दोघांच्या लग्नाच्या बातम्याही खूप चर्चेत आहेत. मात्र, अजून दोघांकडूनही आपल्या नात्याबद्दल काही अधिकृत सांगण्यात आलेलं नाहीये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मलायकानं करिनासोबत पार्टीचे फोटो केले शेअर, ट्रोलर्सने म्हटलं - अर्जुन कुठे लपलाय? Description: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरानं नुकताच आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ज्यात ती आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत दिसतेय. या फोटोमध्ये अर्जुन कपूर दिसत नाहीय, त्यामुळं तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय.
Loading...
Loading...
Loading...