Malaika Arora : मलायका अरोरा जीन्स न घालताच रेस्टॉरंटच्या बाथरुममधून बाहेर पडली, लाजेने झाली चूरचूर

बी टाऊन
Updated Dec 23, 2021 | 15:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

Malaika Arora and her Insta story viral :बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिची एक इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने जीन्स न घालता रेस्टॉरंटच्या बाथरूममधून बाहेर पडल्याची घटना नमूद केली आहे.

Malaika Arora's Instagram story get Viral
मलायका अरोराची इन्स्टा स्टोरी व्हायरल, लाजेने मलायका चूरचूर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मलायका अरोराची इन्स्टाग्राम स्टोरी व्हायरल
  • जीन्स न घालताच रेस्टॉरंटच्या बाथरूममधून मलायका बाहेर
  • कोरोनाच्या व्हॅक्सीनबाबतही स्टोरी शेअर केली होती.


Malaika Arora and her Insta story viral : बॉलिवूड अभिनेत्री मलायका ( Malaika Arora )  अरोरा ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी ती तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर ( Arjun kapoor ) सोबतच्या फोटोंमुळे तर कधी तिच्या बोल्ड आउटफिट्समुळे चर्चेत असते. सध्या तिची एक इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने जीन्स न घालता रेस्टॉरंटच्या बाथरूममधून बाहेर पडल्याची घटना नमूद केली आहे.

मलायका ( Malaika Arora )  ने या घटनेचा उल्लेख कोरोना संदर्भात केला आहे. कोरोनाच्या काळात तिच्यासोबत ही घटना घडली. मलायका ( Malaika Arora ) ने इंस्टा स्टोरीद्वारे सांगितले की, ''त्यावेळी सर्वजण कोरोनामुळे घाबरले होते. आम्हालाही काही सूचत नव्हतं, कळत नव्हतं,त्यादरम्यान मी एका रेस्टॉरंटच्या बाथरूममध्ये गेले. तिथे मी माझ्या कोपराने दार उघडले. तिने पायाने टॉयलेट सीट उचलली. टिश्यू पेपरने फ्लश केला आणि हात धुवून बाहेर पडले. जेव्हा मी माझ्या जागेवर परतआले तेव्हा मला समजले की मी माझी जीन्स घातलीच नव्हती. त्यावेळी मलायकाने सांगितले की तिला किती लाज वाटते.

मलायका ( Malaika Arora )  ने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कोरोना लसीसंदर्भात आणखी एक किस्सा शेअरही केला आहे. तिने लिहिले- पूर्वी जेव्हा कोणी घरी यायचे तेव्हा आम्ही म्हणायचो की घाबरू नका. आमच्या कुत्र्याला लस देण्यात आली आहे. आता आम्ही म्हणतो की घाबरू नका, आम्हाला लस मिळाली आहे. मलायकाच्या या दोन्ही गोष्टी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.


पुरुषांबद्दल ही गोष्ट सांगितली

मलायकाने काही काळापूर्वी तिच्या पसंतीच्या पुरुषांबद्दल सांगितले होते. मलायका म्हणाली होती की, जे पुरुष चांगले चुंबन घेऊ शकतात. ते तिला आवडतात. गॉसिप करणारे पुरुष तिला आवडत नाहीत. मलायकाचे हे वक्तव्यही खूप व्हायरल झाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी