Malaika Arora and Arjun Kapoor : मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या अफवा खोडून काढल्यानंतर काही दिवसांनी, स्टार जोडपे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर 16 जानेवारी 2022 रोजी मुंबईत लंच डेटसाठी एकत्र दिसलेपापाराझींनी मलायका आणि अर्जुनला वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये लंच डेटवर जाताना पाहिले. यावेळी मलायकाने पांढऱ्या रंगाचा रफल ड्रेस घातला होता, तर अर्जुनने फिकट निळ्या रंगाचा स्वेटशर्ट आणि डेनिम जीन्स घातली होती.
गेल्या आठवड्यात मलायका आणि अर्जुनचे ब्रेकअप झाल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मात्र, अर्जुनने 5 जानेवारी 2022 रोजी त्या अफवांना पूर्णविराम दिला जेव्हा त्याने त्याच्या Instagram वर मलायकासोबतचा एक फोटो पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन दिले, "संशयास्पद अफवांना जागा नाही, सुरक्षित रहा. आनंदी रहा. सर्वांना शुभेच्छा आणि प्रेम. "या पोस्टवर मलायकाने रेड हार्ट इमोजीद्वारे प्रतिक्रिया दिली होती.
एकीकडे मलायकाने लंच डेटमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्याचवेळी अर्जुन कपूर स्काय ब्लू कलरच्या हुडीमध्ये दिसला.
मलायकाने या अफवांना पूर्ण विराम दिला जेव्हा तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली
मलायकाने या पोस्टमध्ये लिहिले होते की "खरोखर, जर तुम्हाला 40 व्या वर्षी प्रेम मिळत असेल तर त्यात काही गैर नाही, 30 व्या वर्षी, नवीन स्वप्ने आणि नवीन गोष्टींच्या इच्छा असणं हे जसं खूपच सामान्य आहे. तसंच, वयाच्या 50 व्या वर्षीही, आपण आपल्या जीवनाचा उद्देश शोधू शकता, वयाच्या 25 व्या वर्षी आयुष्य संपत नाही. असे वागणे थांबवा आणि जीवनात आपले विचार प्रगल्भ करा."
मलायका आणि अर्जुन गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, हे जोडपे त्यांच्या वयातील फरकामुळे अनेकदा ट्रोल झाले आहे. अर्जुन,36 वर्षांचा आहे, तो मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, तर मलायका सध्या 48 वर्षांची आहे.