Vijay Babu । नवी दिल्ली : केरळ पोलिसांनी मल्याळम अभिनेता विजय बाबू याच्याविरुद्ध एका अभिनेत्रीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही माहिती समोर येताच विजय बाबू यांनी आरोपांवर स्पष्टीकरण देत स्वत:ला निर्दोष घोषित केले आहे. काल रात्री त्याच्या सोशल मीडिया हँडलवर लाईव्ह येत त्याने दावा केला की आपल्याला या प्रकरणात अडकवले जात आहे. तक्रारदाराविरुद्ध योग्य ती कायदेशीर पावले उचलणार असल्याचे अभिनेत्याने सांगितले. (Malayalam actor Vijay Babu denies rape allegations).
अधिक वाचा : मे महिन्यात तब्बल 11 दिवस बँकांना सुट्टी
मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये विजय बाबू खूप प्रसिद्ध आहेत. मात्र बलात्काराचा खटला दाखल झाल्यानंतर अभिनेता अडचणीत आला आहे. दरम्यान कोझिकोडमध्ये राहणाऱ्या एका महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चित्रपटात काम मिळवून देण्याच्या नावाखाली अभिनेत्याने तिच्यावर बलात्कार केल्याचे महिलेने आपल्या आरोपात म्हटले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे.
कोची येथील फ्लॅटमध्ये विजय बाबूने तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याचा एक अश्लील व्हिडिओही रेकॉर्ड केला आहे. या महिलेने अभिनेत्यावर लैंगिक शोषण करण्यापूर्वी नशा केल्याचा आरोपही केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत, अभिनेत्याने मंगळवारी उशिरा सोशल मीडियावर सांगितले की, "मी काहीही चुकीचे केले नसल्यामुळे मला भीती वाटत नाही. मला 'मी टू' आरोपांबाबत देशाचे कायदेही माहीत आहेत. मी एका महिलेच्या नावाचा खुलासा करून मी या महिलेवर कायदेशीर कारवाई करेन तसेच मानहानीचा दावाही दाखल करेन. मी निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे सर्व पुरावे आहेत."