अजय देवगणची कार अडविणाऱ्याला अटक, पाहा काय होते कारण

वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर सकाळी 8.55च्या सुमाराला ही घटना घडली. त्यावेळी अजय देवगण एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आपल्या कारने फिल्म सिटीला जात होता. सदर इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Ajay Devgan
इसमाने थांबवली अजय देवगणची कार, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा न दिल्याबद्दल केली निंदा 

थोडं पण कामाचं

  • पेशाने चालक असलेल्या इसमाला पोलिसांनी केली अटक
  • अजयच्या अंगरक्षकाने साधला पोलिसांना संपर्क
  • इसमाच्या जामिनासाठी कुणीही आले नाही

मुंबई: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मंगळवारी एका 28 वर्षीय इसमाला अटक (arrest) केली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार त्याच्यावर असा आरोप आहे की त्याने बॉलिवुड अभिनेता (Bollywood actor) अजय देवगण (Ajay Devgan) याची कार (car) अडवली आणि सध्या चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या (farmers protests) पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बाजूने न बोलल्याबद्दल त्याची निंदा (condemnation) केली. केंद्र सरकारने (Central government) आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात (farm laws) सध्या शेतकरी आंदोलन चालू आहे. वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर (western express highway) सकाळी 8.55च्या सुमाराला ही घटना घडली. त्यावेळी अजय देवगण एका चित्रपटाच्या (film) चित्रीकरणासाठी (shooting) आपल्या कारने फिल्म सिटीला (Film City) जात होता.

पेशाने चालक असलेल्या इसमाला पोलिसांनी केली अटक

दिंडोशी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धर्मेंद्र कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर संशयिताचे नाव राजदीप रमेश सिंह असे आहे. तो पेशाने चालक आहे आणि ही घटना घडली त्यावेळी तो रिक्षाने प्रवास करत होता. अजय देवगणच्या कारच्या खिडक्यांना काळी फिल्म लावलेली नसल्याने त्याने अभिनेत्याला ओळखले आणि त्याच्या वाटेत उभा राहिला.

अजयच्या अंगरक्षकाने साधला पोलिसांना संपर्क

कांबळे म्हणाले, “अजय देवगणच्या कारच्या खिडक्यांना काळी फिल्म लावलेली नव्हती. त्यामुळे राजदीप सिंहने अजय देवगणला ओळखले. तो आपल्या रिक्षेतून बाहेर आला आणि गर्दीत अडकलेल्या अजय देवगणच्या कारच्या समोर येऊन उभा राहिला. त्याने त्याची गाडी पुढे जाऊ दिली नाही आणि त्याने अजय देवगणला सांगितले की शेतकऱ्यांच्या बाजूने तो बोलत नसल्याची त्याला लाज वाटली पाहिजे. यानंतर त्याने अजय देवगणला खाली उतरायला सांगितले. शेवटी त्याच्या अंगरक्षकाने त्याला बाजूला नेले आणि आम्हाला संपर्क साधला.”

इसमाच्या जामिनासाठी कुणीही आले नाही

दिंडोशी पोलीसस्थानकाला याबद्दल कळताच सदर इसमाला त्यांनी ताब्यात घेतले आणि भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला. यात कलम 341 (चुकीच्या पद्धतीने रोखणे), 504 (शांतिभंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे) आणि 506 (धमकवणे) या कलमांचा समावेश आहे. ही सर्व कलमे जामिनासाठी पात्र आहेत, मात्र मंगळवारी संध्याकाळपर्यंत या इसमाच्या जामिनासाठीची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी कोणीही पोलीसस्थानकात आले नव्हते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी