Mandakini's daughter-in-law : 'राम तेरी गंगा मैली'च्या मंदाकिनीची सून बुशरा हिरोईनपेक्षा कमी नाही, बुशराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बी टाऊन
Updated Jun 03, 2022 | 16:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mandakini's daughter-in-law : मंदाकिनी यांची सून बुशराचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तिची स्टाइल पाहून चाहते तिचे कौतुक करताना थकत नाहीत.

Mandakini's daughter-in-law Bushra is just like heroine, Bushra's photo goes viral on social media
मंदाकिनीच्या सूनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मंदाकिनी यांच्या सूनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
  • हिरॉईनपेक्षाही सुंदर दिसते मंदाकिनी यांची सून
  • बुशरा नेटफ्लिक्ससाठी काम करते

Mandakini's daughter-in-law : मंदाकिनी ही एक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आहे, तिने अनेक चित्रपट केले आहेत, परंतु ती लोकप्रिय झाली ती विशेषतः 'राम तेरी गंगा मैली' चित्रपटामुळे. आजही लोक त्याच्या चित्रपटाचे आणि तिच्या भूमिकेचे  कौतुक करतात. चित्रपटातील गाणी आणि चित्रपटाची कथा लोकांना खूप आवडली.चित्रपट रिलीज होऊन वर्षे उलटली, पण आजही लोकांना मंदाकिनी आठवते. मंदाकिनी आता पडद्यावर दिसत नसली तरी सोशल मीडियावर तिच्या सुंदर फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते. मंदाकिनीच नाही तर तिची सूनही एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. 

नुकताच मंदाकिनीने तिचा फॅमिली फोटो शेअर केला आहे. ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्याचबरोबर सुनेची स्टाईलही चाहत्यांना खूप आवडली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Bee (@bushrabutt10)

मंदाकिनीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा रबिल ठाकूर विवाहित आहे. रब्बिलने बुशरा बटसोबत लग्न केले आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर,बुशरा एक मॉडेल आणि निर्माती आहे.बुशरा नेटफ्लिक्ससाठी कंटेन्ट प्रोड्युस करते. बुशरा खूपच स्टायलिश आहे, तिच्या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. तिच्या सुनेचा फोटो पाहून मंदाकिनीचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Bee (@bushrabutt10)


यावर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने सांगितले की, सौंदर्यासोबतच प्रतिभासुद्धा आहे.तर दुसर्‍या चाहत्याने कमेंट करत तू अप्रतिम आहेस अशी प्रतिक्रिया दिली. फॅमिली फोटोवर कमेंट करताना एका चाहत्याने म्हटले आहे की, संपूर्ण कुटुंब एकत्र किती छान दिसत आहे.  बुशराचे स्टायलिश फोटो इंटरनेटवर चांगलेच पसंत केले जात आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी