दिग्दर्शक मणिरत्नम यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

बी टाऊन
Updated Jun 17, 2019 | 21:44 IST | टाइम्स नाऊ हिंदी

सुप्रसिद्ध जेष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मणिरत्नम यांना हृदयविकाराचा त्रास जाणवल्याने रुग्नालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.

Mani Ratnam
मणिरत्नम 

मुंबई: सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांनी आपल्या करिअरमध्ये बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले आहेत. तमिळ चित्रपटांचे महान दिग्दर्शक 'द गुरु' अशी त्यांची ओळख. सर्व महान कलाकार त्यांच्यासोबत काम करण्याची एक संधी मिळावी याची आशा बाळगूण असतात. मणिरत्नम यांनी ‘बॉम्बे’, ‘रोजा’, ‘गुरु’, ‘युवा’, ‘दिल से’ सारखे उत्कृष्ट सिनेमे हिंदी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांच्या चित्रपटाबरोबरच सिनेमातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. आजही त्यांचे सिनेमे लोकप्रिय आहेत. याच सर्वांच्या लाडक्या दिग्दर्शकाला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मणिरत्नम यांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, मणिरत्नम यांना हृदयविकार असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मणिरत्नम यांच्या रुग्णालयात दाखल होण्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून प्रथम समोर आली आहे. एका युजरने ट्विट करुन ही बातमी दिली आहे, त्याने लिहिले, “दिग्दर्शक मणिरत्नम ग्रीस रोड अपोलो रुग्णालयात, ह्रदयविकाराच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत. सध्या मणिरत्नम यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या आरोग्या विषयी अद्याप कोणतीही अधिक माहिती समोर आली नाहीये.”  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Director #ManiRatnam admitted to Greams Road Apollo hospital due to cardiac problems.

A post shared by Cinemawoods (@cinema_woods) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#filmmaking #passion #life #dream #aspiring #writer #director #advice #thelegend #maniratnam sir

A post shared by Jazil Jabbar (@jaziljabbar__) on

सर्वप्रथम २००४ साली मणिरत्नम यांना पहिल्यांदा हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर मणिरत्नम यांना युवा चित्रपटाच्या शूटींग दरम्यान पुन्हा एकदा हृदयविकाराचा झटका आला. तसेच मागील वर्षीही त्यांना हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल व्हावं लागलं होतं.

सध्या मणिरत्नम हे Ponniyin Selven या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांचा नवीम चित्रपट लोकांमध्ये खास चर्चेचा विषय बनला आहे. हा चित्रपट मणिरत्नम यांचा ड्रिम प्रोजेक्ट असल्याचेही सांगण्यात येत आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन प्रमुख भूमिकेत असणार आहे. तसेच अनुष्का शेट्टीही या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे. ऐश्वर्या आणि अनुष्का बरोबर अमिताभ बच्चन, अमाल पॉल, जयराम रवी, चियान विक्रम सारखे दिग्गज कलाकार या सिनेमात झळकणार आहेत. Ponniyin Selvan हा चित्रपट २०२० पर्यंत प्रदर्शनासाठी तयार होण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिग्दर्शक मणिरत्नम यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल Description: सुप्रसिद्ध जेष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मणिरत्नम यांना हृदयविकाराचा त्रास जाणवल्याने रुग्नालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola