Allu arjun's Srivalli song Marathi version : अल्लू अर्जुनच्या पुष्पा गाण्याची मराठी आवृत्ती, श्रीवल्ली गाणे ऑनलाइन हिट, पाहा हा व्हिडिओ

बी टाऊन
Updated Jan 14, 2022 | 16:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Allu arjun's Srivalli song Marathi version : मराठी श्रीवल्ली आवृत्ती ऑनलाइन हिट झाली आहे. पुणे पोलीस विभागातील वाहतूकर हवालदार आतिश खराडे यांनी पुष्पा: द राईज मधील श्रीवल्ली या गाण्याची मराठी आवृत्ती शेअर केली आणि त्याला खूप प्रशंसा मिळत आहे.

Allu arjun's Srivalli song Marathi version
अल्लू अर्जुनच्या श्रीवल्ली गाण्याचे मराठी व्हर्जन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अल्लू अर्जुनच्या श्रीवल्ली गाण्याचे मराठी व्हर्जन
  • आतिश खराडे यांचे श्रीवल्ली गाण्याचे मराठी व्हर्जन ऑनलाईन हिट
  • गाण्याच्या मराठी व्हर्जनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद

Allu arjun's Srivalli song Marathi version : अल्लू अर्जुन स्टारर तेलुगु चित्रपट पुष्पा: द राइज डिसेंबर २०२१ मध्ये रिलीज झाल्यापासून समीक्षकांकडून पसंतीची पावती मिळवत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या अभिनयासह, चित्रपटातील गाण्यांनी इंटरनेटवर एकच धमाल उडवून दिलेली आहे. हा चित्रपट तेलुगु व्यतिरिक्त हिंदी आणि कन्नड सारख्या इतर अनेक भाषांमध्ये रिलीज झाल्यामुळे, अनेक नेटिझन्स मातृभाषेतील आवृत्तीत गाणी तयार करत आहेत. पुणे पोलीस विभागातील वाहतूक हवालदार आतिश खराडे यांनी चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्याचे मराठी व्हर्जन शेअर केले आहे आणि खूप प्रशंसा मिळवली आहे.

व्यवसायाने पोलीस असलेले खराडे त्यांच्या YouTube चॅनलवर  संगीताची आवड असल्याने असे व्हिडिओ कायम शेअर करत असतात. एका नव्या व्हिडिओमध्ये, त्यांनी मूळत: सिद श्रीरामने गायलेल्या श्रीवल्लीची मराठी आवृत्ती सादर केली.

श्रीवल्ली देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केले आहे आणि गीत चंद्रबोस यांचे आहे. या गाण्याला यूट्यूबवर 17 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

खराडे यांच्या गाण्याचे मराठी व्हर्जन लोकांना खूप आवडले. काहींनी त्याची आवड जोपासल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले, तर इतरांनी त्याचा आवाज किती अद्भुत आहे याबद्दल लिहिले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी