चित्रपटसृष्टीला मे महिना ठरला दु:खाचा; अवघ्या चार दिवसात गमावले तीन गायक, दोघांचा स्टेजवर मृत्यू तर एकाची हत्या

बी टाऊन
भरत जाधव
Updated Jun 01, 2022 | 14:33 IST

कोलकाता येथील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात गायक कृष्णकुमार कुननाथ यांचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले. वयाच्या 53 व्या वर्षी कोलकात्यात अखेरचा श्वास घेतला. चाहत्यांच्या मनाला भिडणारे गाणे गात केकेनं जगाचा निरोप घेतला आहे. केकेच्या निधनामुळे संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.

May is a month of sorrow; Three singers lost in just four days
मे महिना ठरला दु:खाचा; अवघ्या चार दिवसात गमावले तीन गायक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गायक केकेच्या निधनानंतर त्यांचे चाहते शोक व्यक्त करताना दिसत आहेत.
  • केरळात लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान 'माना हो तुम बेहद हसीन' हे हिंदी गाणं सादर करत असतानाच एदवा बशीर यांचं निधन

मुंबई : कोलकाता येथील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात गायक कृष्णकुमार कुननाथ यांचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले. वयाच्या 53 व्या वर्षी कोलकात्यात अखेरचा श्वास घेतला. चाहत्यांच्या मनाला भिडणारे गाणे गात केकेनं जगाचा निरोप घेतला आहे. केकेच्या निधनामुळे संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, गायक अरमान मलिक, अभिनेत्री सोनल चौहान आणि मुनमुन दत्तासह अनेक सेलिब्रिटींनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 

सोशल मीडियावर गायक केकेच्या निधनानंतर त्यांचे चाहते शोक व्यक्त करताना दिसत आहेत. दरम्यान चित्रपटसृष्टी आणि संगीतसृ्ष्टीसाठी हे वर्ष दु:खदायक ठरलं आहे. आधी बप्पी लहरी, लता मंगेशकर, नंतर सिद्धू मुसेवाला, एदवा बशीर आणि केके. 2022 मधील मे महिना हा सर्वात जास्त दु:ख देणारा ठरलाय. या मे महिन्यात आधी मल्याळी पार्श्वगायक एदवा बशीर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर सिद्धू मूसेवालाची हत्या झाली आणि आता केके यांचे निधन झााले आहे. 

दिग्गज पार्श्वगायक एदवा बशीर 

28 मे 2022 रोजी वयाच्या 78 व्या वर्षी एदवा बशीर यांनी अखेरचा श्वास घेतला. केरळात लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान 'माना हो तुम बेहद हसीन' हे हिंदी गाणं सादर करत असतानाच एदवा बशीर व्यासपीठावर कोसळले. त्यानंतर लगेचच त्यांना चेरथाला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मल्ल्याळम संगीत विश्वातील एदवा बशीर हे एक मोठे नाव आहे. त्यांनी अनेक मल्याळम सिनेमांसाठी गाणी गायली आहेत. 

एदवा बशीर यांनी अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. त्यांचे अन्नपूर्णेश्वरी हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. चाहत्यांच्या हे गाणं पसंतीस उतरलं होतं. त्यांचा आवाज सातासमुद्रापार पोहोचला आहे. अमेरिका, यूके, युरोप अशा अनेक देशांत त्यांचे चाहते आहेत. त्यांनी संगीतालय नावाचा म्युझिक ग्रुपदेखील सुरू केला आहे. 'वीणा वैकुम' या गाण्याने त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. 

सिद्धू मूसेवाला 

शुभदीप सिंग सिद्धू जो सिद्धू मूस वाला या नावाने ओळखला जातो. सिद्धू मुसेवाला हा एक भारतीय गायक, रॅपर, अभिनेता आणि राजकारणी होता. लाँरेन्स बिश्नॉई टोळीनं 29 मे रोजी त्याची हत्या केली आहे. त्याने आपल्या करिअरची सुरुवात लाइसेंस गाण्याच्या लिहिण्याने केली आहे. हे गाणे निंजाने गायले आहे. तर "जी वॅगन" नावाच्या युगल गीतातून सिदधू मुसेवाला गायनात पदार्पण केले. 2018 मध्ये, त्याने त्याचा पहिला अल्बम PBX 1 रिलीज केला, जो बिलबोर्ड कॅनेडियन अल्बम चार्टवर 66 व्या क्रमांकावर होता. अल्बमनंतर त्यांनी स्वतंत्रपणे स्वतःची गाणी प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली.

केके  (कृष्णकुमार कुननाथ)

केके या नावाने प्रसिद्ध असलेले गायक (Singer) कृष्णकुमार कुननाथ (Krishnakumar Kunnath) यांचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले. हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्यानं केकेचं निधन झाले आहे.  1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात तरुणांमध्ये त्याची ही गाणी खूप लोकप्रिय झाली होती. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘बचना ए हसीनो’ मधील ‘खुदा जाने’, ‘काइट्स’ मधील ‘जिंदगी दो पल की’, ‘जन्नत’ मधील ‘जन्नत’, ‘तुही मेरी शब है’ या गाण्यांतून केके थेट हृदयातील भावनांना हात घालणारा गायक होता. ‘गँगस्टर’ मधील ‘आँखों में तेरी’ मधील ‘ओम शांती ओम’, ‘बजरंगी भाईजान’मधील ‘तू जो मिला’ अशी अनेक गाणी त्याने गायली आहेत.  
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी