'मेरी आवाज ही पहचान है...' चे गायक भूपिंदर सिंग यांचं निधन

Bhupinder Singh passes away: प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंग यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले. बॉलिवूडमधील अनेक गाण्यांसाठी ओळखले जाणारे भूपिंदर सिंग यांनी सोमवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला.

meri awaaz hi pehchaan hai fame singer bhupinder singh ingh dies at mumbai hospital confirmed by wife mithali singh
'मेरी आवाज ही पहचान है...' चे गायक भूपिंदर सिंग यांचं निधन 
थोडं पण कामाचं
  • प्रसिद्ध बॉलिवूड गायक भूपिंदर सिंग यांचं निधन
  • भूपिंदर सिंग यांनी सोमवारी मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
  • पत्नी मितालीने आयएएनएस वृत्तसंस्थेला दिली माहिती

Bhupinder Singh passes away:'मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे...'चे गायक भूपिंदर सिंग हे आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत.  भूपिंदर सिंग यांचे आज (18 जुलै) निधन झाले. त्यांची पत्नी आणि गायिका मिताली सिंग यांनी ज्येष्ठ पार्श्वगायक भूपिंदर सिंग यांच्या निधनाबाबत माहिती दिली. बॉलिवूडमधील अनेक गाण्यांसाठी ओळखले जाणारे भूपिंदर सिंग यांनी सोमवारी संध्याकाळी 7:45 वाजता मुंबईतील अंधेरी येथील क्रिटिकेअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 

पत्नी मितालीने आयएएनएस वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, 'ते काही दिवसांपासून आरोग्याच्या अनेक समस्यांनी त्रस्त होते. यामध्ये मूत्राशयाच्या समस्यांचाही समावेश होता.' 

अधिक वाचा: Bollywood Couple: रणबीर-आलियापासून अमिताभ-जया आणि दीपिका-रणवीरपर्यंत; 'हे' रील लाइफ स्टार्स बनले खऱ्या आयुष्यातले कपल

८२ वर्षीय गायक भूपिंदर सिंग यांच्या अंत्यसंस्काराशी संबंधित अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

भूपिंदर सिंग यांनी वडिलांकडून घेतले संगीताचे शिक्षण 

भूपिंदर सिंग यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1940 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला होता. त्यांचे वडील प्रोफेसर नत्था सिंग हे उत्कृष्ट संगीतकार होते, पण संगीत शिकवण्यात ते कठोर होते. भूपिंदर यांना सर्वप्रथम संगीताचे शिक्षण नत्था सिंग यांनी दिले होते. वडिलांच्या काटेकोरपणामुळे भूपिंदर यांना संगीताचा तिटकारा होता, पण हळूहळू त्याच्या मनात संगीताची आवड निर्माण होऊ लागली आणि मग ते शिकत राहिले.

भूपिंदर यांनी 1980 च्या दशकात बंगाली गायिका मिताली मुखर्जीशी लग्न केले. लग्नानंतर ते काही पार्श्वगायनापासून दूर राहिले. दोघांनी एकत्र अनेक शो केले आणि भूपिंदर-मितालीची जोडी खूप प्रसिद्ध झाली. दोघांनी खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवली. या जोडप्याला मूलबाळ नाही.

भूपिंदर सिंग यांनी अनेक आपल्या स्वर्गीय आवाजात अनेक उत्कृष्ट गाणी गायली आहेत. जसे की, 'नाम गुम जाएगा, करोगे याद तो, मीठे बोल बोले, खुश रहो अहले-वतन हम तो सफर करते हैं, कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता, दरो-दीवार पे हसरत से नजर करते हैं', ही गाणी त्यांनी गायली होती. जी आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात. 

अधिक वाचा: बकरी ईदच्या दिवशी अभिनेत्री हिना खान का झाली एवढी हळवी?

भूपिंदर सिंग यांच्या निधनाने एक दर्जेदार पार्श्वगायक काळाच्या पडद्याआड गेला आहे. मात्र, त्यांचा स्वर्गीय आवाज हा त्यांच्या गाण्यांमधून आपल्यामध्ये कायम राहणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी