जाणून घ्या का होतेय प्रियंकाची अभिनेत्री रेखासोबत तुलना?

बी टाऊन
Updated May 08, 2019 | 19:53 IST | टाइम्स नाऊ हिंदी

MET Gala 2019: बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा नुकतीच ‘मेट गाला २०१९’मध्ये दिसली आणि यादरम्यान तिच्या लूकची खूप चर्चा आणि थट्टा सुरू आहे. मात्र या लूकची तुलना रेखासोबत केली जातेय. जाणून घ्या यामागचं कारण...

Priyanka Chopra and Rekha
प्रियंका आणि रेखाच्या लूकची तुलना  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: अभिनेत्री प्रियंका चोपडा एक अशी अभिनेत्री आहे जिनं बॉलिवूडपासून तर हॉलिवूडपर्यंत आपली एक ओळख निर्माण केली आहे. नुकतीच प्रियंका न्यूयॉर्कमध्ये झालेल्या ‘मेट गाला २०१९’मध्ये पती निक जोनास बरोबर पोहोचली. या इव्हेंटमध्ये प्रियंका एका वेगळ्याच लूकमध्ये दिसली. तिचा हा लूक पाहून अनेक यूजर्सनी सोशल मीडियावर प्रियंकाला ट्रोल केलं. शिवाय तिच्या लूकबाबतचे अनेक मीम्स पण व्हायरल झाले. तर दुसरीकडे प्रियंकाच्या लूकची अनेकांनी स्तुतीही केली. प्रियंकाची स्तुती करतांना म्हटलं गेलं की, तिनं आपल्यासाठी एकदम वेगळ्या आणि फ्रेश लूकची निवड केली.

‘मेट गाला २०१९’मध्ये प्रियंकाच्या लूकचे फोटो दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झालेत. प्रियंका चोप्राच्या या लूकची बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्या लूकसोबत तुलना केली जात आहे. सोशल मीडियावर प्रियंका सोबत रेखाचे फोटो सुद्धा शेअर केले जात आहेत. ज्यात दोघींचाही लूक अनेक बाबतीत सारखा वाटतो. समोर आलेल्या फोटोंमध्ये दोघींच्या मेकअपपासून तर त्यांच्या हेअरस्टाईलबद्द्लची समानता दाखवली जात आहे.

Our #rekha can destroy #metgala The ultimate Queen of style and fashion

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

Met 2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

या पोस्टवर अजूनही अनेक लोक प्रियंकाच्या लूकची थट्टा उडवत आहेत. या पोस्टवर कमेंट करत यूजर्स सतत दोघींची तुलना होऊच शकत नाही, असं म्हणतायेत. यूजर्सच्या मते रेखा प्रियंकापेक्षा खूप चांगल्या दिसत आहेत.

‘मेट गाला २०१९’मध्ये प्रियंकानं डियॉरनं डिझाईन केलेला सॉफ्ट पेस्टल गाऊन घातला होता. थाय हाय स्लिट हा गाऊन प्रियंकानं शिमरी टाइट्ससोबत परिधान केला होता. तिच्या या गाऊनमध्ये पिंक आणि यलो फेदर लागलेले होते. तर तिनं डोळे आणि आयब्रोमध्ये सिल्वर कलरचा मेकअप केला होता आणि पिंक कलरचं लिपस्टिक लावलं होतं. प्रियंकाच्या या लूकला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. यावेळी ‘मेट गाला २०१९’ची थीम कॅम्प: नोट्स ऑन फॅशन होती.

CAMP: Notes on Fashion #MetGala2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

वर्कफ्रंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रियंका चोप्रा सोनाली बोसचा चित्रपट ‘द स्काय ईज पिंक’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे प्रियंका तीन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतणार आहे. या चित्रपट तिच्यासोबत जायका वसीम आणि फरहान अख्तर मुख्य भूमिकेत असतील. चित्रपटाची कथा आयशा चौधरी नावाच्या मुलीच्या आयुष्यावर आधारित आहे. जी वयाच्या १३ व्या वर्षी पल्मोनरी फायब्रोसिस नावाचा आजार असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोटीवेशनल स्पीकर झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
जाणून घ्या का होतेय प्रियंकाची अभिनेत्री रेखासोबत तुलना? Description: MET Gala 2019: बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा नुकतीच ‘मेट गाला २०१९’मध्ये दिसली आणि यादरम्यान तिच्या लूकची खूप चर्चा आणि थट्टा सुरू आहे. मात्र या लूकची तुलना रेखासोबत केली जातेय. जाणून घ्या यामागचं कारण...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नाकारली १० कोटींच्या जाहिरातीची ऑफर, जाणून घ्या कारण
Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नाकारली १० कोटींच्या जाहिरातीची ऑफर, जाणून घ्या कारण
Box office: मिशन मंगल आणि बाटला हाऊस सिनेमाचं दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
Box office: मिशन मंगल आणि बाटला हाऊस सिनेमाचं दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
[VIDEO] अनुष्का शेट्टीसोबतच्या रिलेशनशिपवर साउथ सुपरस्टार प्रभासनं मौन सोडलं
[VIDEO] अनुष्का शेट्टीसोबतच्या रिलेशनशिपवर साउथ सुपरस्टार प्रभासनं मौन सोडलं
[VIDEO] शाहरूख खान लवकरच या सिनेमातून करणार कमबॅक
[VIDEO] शाहरूख खान लवकरच या सिनेमातून करणार कमबॅक
[VIDEO] : आलियाला लग्नाची मागणी घालताच रणबीर कपूर झाला भावूक
[VIDEO] : आलियाला लग्नाची मागणी घालताच रणबीर कपूर झाला भावूक
[VIDEO]: जाणून घ्या अभिनेता मिलिंद सोमण यांच्या फिटनेसचं सीक्रेट
[VIDEO]: जाणून घ्या अभिनेता मिलिंद सोमण यांच्या फिटनेसचं सीक्रेट
Salman Khan Wedding: या २१ वर्षींय अभिनेत्रीला सलमानसोबत करायचंय लग्न, व्यक्त केली इच्छा
Salman Khan Wedding: या २१ वर्षींय अभिनेत्रीला सलमानसोबत करायचंय लग्न, व्यक्त केली इच्छा
Batla House: जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई, पाहा तिसऱ्या दिवशी किती कमावला गल्ला
Batla House: जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई, पाहा तिसऱ्या दिवशी किती कमावला गल्ला