MeToo: नाना पाटेकर यांना मोठा दिलासा, तनुश्री दत्ताचा आरोप सिद्ध न झाल्याने केस बंद 

बी टाऊन
Updated Jun 13, 2019 | 15:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्या विरूद्ध लैंगिक छळाचा आरोप लावला होता. यात तिने म्हटले होते की नाना कशा पद्धतीने २००८ मध्ये चित्रपट हॉर्न ओके प्लीजच्या सेटवर छेडछाड केली होती. 

tanushree dutta and nana patekar
तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर 

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या Me Too आंदोलनाला खूप मोठा धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांच्यावर तनुश्रीने लैंगिंक छळाचा आरोप केला होता.  पण या प्रकरणात आरोपांबाबत पुरावे न मिळाल्याने याप्रकरणी अभिनेते नाना पाटेकर यांना दिलासा मिळाला आहे. चौकशीत तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांना आधारहीन मानण्यात आले.  खूप लांब चाललेल्या या चौकशीनंतर पोलिसांनी ही केस बंद करण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान तनुश्रीच्या वकिलांनी सांगितले की, या प्रकरणात ते हार मानणार नाही, न्यायासाठी पुढे अपिल करणार आहे. 

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्या विरूद्ध लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला होता. यात तिने म्हटले की नाना यांनी २००८ मध्ये आलेला चित्रपट हॉर्न ओके प्लीजच्या सेटवर तिच्यासोबत छेडछाड केली होती. या प्रकरणाला पोलिसांनी गंभीर समजून नाना पाटेकर यांच्या विरूद्ध FIR दाखल केली होती. पण नाना पाटेकर यांच्या विरोधातील ही लैंगिक छळाची केस काही महिन्यात कमकुवत पडताना दिसली. ओशिवारा पोलिसांना गेल्या महिन्यापर्यंत एकही असे स्टेटमेंट मिळाले नाही की ते लैंगिक छळाच्या आरोपांना सिद्ध करू शकेल. 

या रिपोर्टमध्ये पोलिस सूत्रांनी सांगितले की, या प्रकरणातील कोणताही साक्षीदार हा तनुश्रीने लावलेल्या आरोपांची पुष्टी करत नव्हता. इतके नव्हे तर डेजी शाह, हिने देखील अशी कोणतीही घटना मला आठवत नसल्याचे आपल्या साक्षीत म्हटले आहे, डेजी शाह, त्या वेळी गणेश आचार्य यांना कोरिओग्राफीमध्ये असिस्टंट म्हणून काम करत होती आणि घटना घडली तेव्हा ती सेटवर होती. या प्रकरणी सेटवर असलेल्या साक्षीदारांचे १२ ते १५ वेळा साक्ष नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पण तनुश्री दत्ता यांनी सांगितलेल्या वक्तव्याशी कोणाचेही मत जुळत नव्हते. त्यामुळे नाना पाटेकर यांना दिलासा मिळताना दिसत आहे. 

काही दिवसांपूर्वी तनुश्री दत्ता यांनी त्या बातम्यांना फेटाळले होते की, यात दावा केला होता की, नाना पाटेकर यांना पोलिसांनी क्लिन चीट दिली आहे. तनुश्रीने म्हटले होते की, मीडियामध्ये खोट्या बातम्या प्रसारित करण्यात येत आहे, की नाना पाटेकर यांना क्लिन चीट मिळाली आहे. पण पोलिसांनी असे काही केले नाही, माझे वकील नितीन सातपुते यांनी याबाबत कन्फर्म केले आहे. अशा अफवा नाना पाटेकर यांची टीम पसरवत आहे. नाना पाटेकर यांना इंडस्ट्रीमध्ये काम मिळत नाही आहे. त्यामुळे आपली प्रतिमा सुधारण्यासाठी असा पब्लिसिटी फंडा करत असल्याचा आरोपही तनुश्रीने लावला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
MeToo: नाना पाटेकर यांना मोठा दिलासा, तनुश्री दत्ताचा आरोप सिद्ध न झाल्याने केस बंद  Description: तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्या विरूद्ध लैंगिक छळाचा आरोप लावला होता. यात तिने म्हटले होते की नाना कशा पद्धतीने २००८ मध्ये चित्रपट हॉर्न ओके प्लीजच्या सेटवर छेडछाड केली होती. 
Loading...
Loading...
Loading...