Mika Singh Birthday : बॉलिवूड आणि पंजाबी गायक मिका सिंग 10 जून रोजी वाढदिवस साजरा करत आहे. मिका सिंगचे खरे नाव अमरिक सिंग आहे. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे मिका सिंगचा जन्म झाला. मिका सिंग पंजाबी लोकप्रिय गायक दलेर मेहंदीचा भाऊदेखील आहे. मिकाने कारकीर्दीची सुरुवात दलेर मेहेंदी यांच्या बँडमध्ये गिटार वादक म्हणून केली.
मिका सिंगने दलेर मेहंदीचे 'डर दी रब रब' हे सुपरहिट गाणे तयार केले होते. हे गाणे स्वतः मिका सिंगला गायचे होते. दिग्दर्शकानेही मिकाच्या या प्रस्तावाला होकार दिला होता मात्र, मिका सिंगचा आवाज ऐकून त्याने नकार दिला. त्यानंतर त्यांनी अनेक स्टुडिओच्या फेऱ्या केल्या. मात्र, सर्वत्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यानंतर मिका सिंगने स्वतःचा अल्बम लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. या अल्बममधील 'सावन में लग गई आग'हे सुपरहिट गाणे प्रेक्षकांना खूप आवडले होते. आणि त्यानंतर मिका सिंग यांचे नशीबच पालटले. त्यानंतर मिका सिंगने मागे वळून पाहिले नाही. एकापाठोपाठ एक अनेक सुपरहिट गाणी, अल्बम मिका सिंग यांनी दिली.
मिका सिंग अब्जावधी संपत्तीचा मालक आहे. मिका एकेकाळी फक्त ५०० रुपयांत गाणे म्हणायचा. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिका सिंग 6 मिलियन डॉलर म्हणजेच 450 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. आलिशान फार्महाऊसशिवाय अनेक महागड्या गाड्याही मिका सिंगकडे आहेत. मिकाला बाईक चालवायलाही आवडते. मिका सिंग अशा काही सेलिब्रिटींपैकी एक आहे ज्यांच्याकडे स्वतःचे खाजगी जेट आहे. मिका सिंगचे नाव कायमच वादात सापडले आहे. राखी सावंतला भर पार्टीत मिकाने केलेले लिपलॉक हा कायमच वादाचा मुद्दा राहिलेला आहे.
मिका सिंग यंदा वाढदिवस साजरा करणार नाही. सिद्धू मुसेवाला आणि गायक केके यांच्या निधनामुळे मिका सिंगने हा निर्णय घेतला आहे. मिका सिंगने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले होते की, सिद्धू मुसेवालाची हत्या हा आपल्या समाजावरील डाग आहे. वर्क फ्रंटवर, मिका सिंगच्या वाढदिवसानिमित्त,त्याचा स्वयंवर शो मिका दी वोहती सुरू होत आहे. याद्वारे मिका सिंग आपली वधू निवडणार आहे.