Mika Singh Dance : टाइम्स म्युझिकचे 'व्हॉट द लक' (What the luck) हे गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. मिका सिंगने (Mika Singh) हे गाणं गायलं असून 'जहाँ चार यार'(Jahaan Chaar Yaar) या आगामी सिनेमातील हे गाणं आहे. संजीव चतुर्वेदी (Sanjeev Chaturvedi) यांनी हे गाणं लिहिले आणि संगीतबद्ध केलेले आहे.
विनोद बच्चन (Vinod Bachchan) यांनी 'जहाँ चार यार' सिनेमाची निर्मिती केली असून कमल पांडे (Kamal Pandey) यांनी हा सिनेमा दिग्दर्शिक केलेला आहे. (Mika Singh dance on Times music Rocking Party song What the luck is Out )
स्वरा भास्कर, शिखा तलसानिया, मेहर विज आणि पूजा चोप्रा यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमात 5 गाणी आहेत. ठेका धरायला लावणारी, थिरकायला लावतील अशीच ही गाणी आहेत. नुकतंच या सिनेमातील व्हॉट द लक हे रॉकिंग पार्टी साँग रिलीज करण्यात आलं आहे. डान्स नंबरचा बादशाह असलेल्या मिका सिंगने हे रॉकिंग पार्टी साँग गायलं आहे.
अधिक वाचा : स्कूल युनिफॉर्ममधल्या 'या' चिमुरडीला ओळखलंत का?
"जहाँ चार यार या सिनेमातील गाणी खूपच रिफ्रेशिंग असल्याचं मिका सिंगने म्हटलं आहे. यातल्या प्रत्येक गाण्यासाठी संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. व्हॉट द लक हे एक रॉकिंग पार्टी साँग असून साऱ्यांनाच थिरकायला भाग पाडेल" असंही मिका सिंगने म्हटलंय. बऱ्याच दिवसांनी असं रिफ्रेशिंग पार्टी साँग गायला मिळल्याचाआनंद झाल्याचंही मिकाने आवर्जून सांगितलं.
दुसरीकडे, अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणते, "या गाण्याचं शूटिंग करताना खूप मजा आली. हे गाणं खूप lively आहे. मिका सिंगने गाण्याला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे.
प्रत्येक पार्टीत प्लेलिस्टमध्ये हे पॉवर-पॅक्ड मसाला साँग नक्की वाजेल, आणि साऱ्यांनाच थिरकायला भाग पाडेल" असं स्वरा भास्करने म्हटलं आहे. स्वरा या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे.
अधिक वाचा : जिओ ग्राहकांसाठी जबरदस्त प्लॅन! अमर्यादित कॉलिंग, डेटा...
तर, "माझ्यासाठी, डान्स नंबर शूट करणं नेहमीच खास असतं" असं म्हणतेय अभिनेत्री शिखा तलसानिया. असे ट्रॅक सेटवरील वातावरण एकदम चैतन्यमय करतात. मिका सिंगचा आवाज आणि थिरकायला लावणारं म्युझिक बसं अजून काय हवं." 16 सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होत असल्याचं सांगायला अभिनेत्री शिखा तलसानिया विसरली नाही.
तर "जहाँ चार यार मधील माझ्या आवडीच्या गाण्यापैकी हे गाणं असल्याचं म्हणतेय अभिनेत्री पूजा चोप्रा. "हे रॉकिंग पार्टी साँग असून, प्रेक्षकांना सिनेमा आणि सिनेमातील गाणी आवडतील अशी खात्री वाटत असल्याचं पूजा चोप्राने म्हटलंय.
अधिक वाचा : अमित शहांचा मुंबई दौरा, लालबागच्या राजाचे घेणार दर्शन
एकूणचं काय तर 'व्हॉट द लक' हे टाइम्स म्युझिकचे साँग आता रिलीज झाले आहे. टाइम्स म्युझिकच्या YouTube चॅनलवर ते उपलब्ध आहे. तेव्हा या गाण्यावर थिरकायला सज्ज व्हा. लेट्स राँक ऑन द म्युझिक.