Mika Singh Birthday: कोट्यावधींच्या संपत्तीचे मालक आहेत मीका सिंग, खासगी विमानाने करतात प्रवास

बी टाऊन
Updated Jun 10, 2021 | 13:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mika Singh Birthday: मीका सिंह हे बॉलिवुडमध्या 10 सर्वात महागड्या पार्श्वगायकांपैकी एक आहेत. आज म्हणजेच 10 जून रोजी ते आपला वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने जाणून घ्या मीका सिंह यांच्या मालमत्तेबद्दल.

Mika Singh
कोट्यावधींच्या संपत्तीचे मालक आहेत मीका सिंग, खासगी विमानाने करतात प्रवास 

थोडं पण कामाचं

  • बॉलिवुडमधल्या 10 सर्वात महाग गायकांपैकी एक आहेत मीका सिंह
  • 10 जून रोजी मीका सिंह साजरा करत आहेत आपला वाढदिवस
  • पंजाबी गायक दिलेर मेहंदी यांचे छोटे भाऊ आहेत मीका सिंह

नवी दिल्ली: Mika Singh Birthday: मीका सिंह (Mika Singh) सध्या बॉलीवुडमधल्या (Bollywood) सर्वात महागड्या (highest paid) पार्श्वगायकांपैकी (playback singers) एक आहेत. एका गाण्यासाठी (song) ते लाखो रुपये घेतात. आज म्हणजे 10 जून रोजी ते आपला वाढदिवस (birthday) साजरा करत आहेत. 10 जून 1977 रोजी जन्मलेले मीका सिंह हे पंजाबी गायक (Punjabi singer) दिलेर मेहंदी (Diler Mehendi) यांचे छोटे भाऊ (younger brother) आहेत. त्यांचे खरे नाव (real name) अमरिक सिंह (Amrik Singh) असे आहे आणि त्यांच्या वडिलांचे नाव बलबीर सिंह आणि आईचे नाव अजमेर सिंह आहे. हे दोघेही राज्य पातळीवरचे कुस्तीपटू होते. मीका हे आपल्या भावंडांमध्ये सर्वात धाकटे आहेत.

एकेकाळी फक्त 500 रुपयांत गाणे म्हणत असत मीका सिंह

सुरुवातीला मीका सिंह हे फक्त 500 रुपयांमध्ये गाणी गात असत. आणि आज एका गाण्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी ते लाखो रुपयांचे मानधन घेतात. पार्टी किंवा लग्न, किंवा रंगमंचीय कार्यक्रमांसाठी मीका सिंह 20 ते 50 लाख रुपये घेतात. एका आघाडीच्या संकेतस्थळानुसार ते साधारण 6 मिलियन डॉलर म्हणजेच 450 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्याकडे एक आलीशान फार्महाऊसही आहे ज्याची किंमत कोट्यावधी रुपये आहे.

खासगी जेटचे मालक आहेत मीका सिंह

हिंदी चित्रपटसृष्टीत असे फार कमी सेलिब्रिटीज आहेत ज्यांच्याकडे खासगी जेट आहे. या यादीत अनेक आघाडीचे अभिनेते आहेत. मीका सिंह जेव्हा पहिल्यांदा काम मागण्यासाठी गेले होते तेव्हा बीएमडब्ल्यू कारमधून गेले होते. स्वतः यशस्वी झाल्यानंतर त्यांनी अनेक लग्झरी कार्स खरेदी केल्या. मीका यांच्याकडे लेटेस्ट सीरीजमधल्या अनेक गाड्या आहेत. त्यांना बुलेट आणि हम्मर या गाड्यांवर फिरणे खूप आवडते.

वादविवादांशी आहे मीका सिंह यांचे जवळचे नाते

मीका सिंह यांचे वादविवादांशी जवळचे नाते आहे. ते अनेकदा वादग्रस्त परिस्थितीत अडकले आहेत. काही काळापूर्वी पाकिस्तानमध्ये जाऊन कार्यक्रम केल्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली होती. नंतर त्यांनी याबद्दल माफी मागितली होती आणि प्रकरण मिटले होते. 2006 साली आपल्या वाढदिवशी केक कापल्यानंतर त्यांनी आयटम गर्ल राखी सावंतला लिपलॉक केले होते. यानंतर राखी सावंत कोर्टात गेली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी