मिलिंद सोमणने घेतली पंतप्रधान मोदींची भेट; प्राचीन भारतीय परंपरेतील खेळ, आरोग्य आणि फिटनेसवर चर्चा

बी टाऊन
भरत जाधव
Updated Aug 24, 2022 | 17:09 IST

माजी अभिनेता (Former actor) आणि सध्याचा फिटनेस गुरू मिलिंद सोमणने (Milind Soman) अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेतली. दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयातून मिलिंदने बुधवारी पंतप्रधानांसोबतचा स्वतःचा एक फोटो ट्विट केला. युनिटी रन (Unity Run) या उपक्रमाच्या समारोपावेळी पंतप्रधान मोदींची आपण भेट घेतली,

Milind Soman met Prime Minister Modi
मिलिंद सोमणने घेतली पंतप्रधान मोदींची भेट  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • अभिनेता मिलिंद सोमणने पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट.
  • पीएम मोदींसोबतचा फोटो मिलिंदने शेअर केला आहे.

नवी दिल्ली :  माजी अभिनेता (Former actor) आणि सध्याचा फिटनेस गुरू मिलिंद सोमणने (Milind Soman) अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेतली. दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयातून मिलिंदने बुधवारी पंतप्रधानांसोबतचा स्वतःचा एक फोटो ट्विट केला. युनिटी रन (Unity Run) या उपक्रमाच्या समारोपावेळी पंतप्रधान मोदींची आपण भेट घेतली, असं सोमणने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. दरम्यान पंतप्रधान मोदी हे उत्साहाविषयी आणि फिटनेसविषयी खूप जागृक असतात. तर मिलिंद सोमण यांचा फिटनेस हा आत्ताच्या तरुण मुलांना लाजवणारा आहे. अशात दोन्ही फिटनेसप्रेमी एकमेंकांना भेटले तर काय चर्चा करतील याची कल्पना आपली आली असेल. अर्थातच दोघांनी "खेळ, आरोग्य आणि तंदुरुस्ती या प्राचीन भारतीय परंपरेतील परस्पर संबंधाविषयी दोघांनी चर्चा केली. 

काय आहे मिलिंदचं ट्विट - 

माननीय पंतप्रधान मोदींनी भेटून खूप आनंद झाला. युनिटी रन आणि प्राचीन भारतीय परंपरेतील खेळ, आरोग्य आणि फिटनेसमधील परंपरांमध्ये परस्पर स्वारस्य पाहून आनंद झाला. देशभरात योग आणि आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी ते करत असलेल्या सर्व गोष्टींसाठी मी त्यांचे आभार मानले.”

Read Also : बँक कर्मचाऱ्यांची मज्जाच मज्जा; सप्टेंबरमध्ये 13 दिवस सुट्टी

मिलिंद फोटोमध्ये निळ्या रंगाची जीन्स, मरून जॅकेट आणि त्याची स्टाईल असलेली चप्पल घातली होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी कुर्ता-पायजामा आणि जॅकेट घातलेले होते.  मिलिंदने  झाशी ते दिल्ली या 450 किलोमीटरच्या अनवाणी ट्रेकचा उल्लेख "युनिटी रन" असा केला होता.  भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी" मिलिंद धावला होता.  स्वातंत्र्याची 75 वर्षानिमित्त मिलिंद सोमणने झाशीच्या किल्ल्यापासून सुरू केलेली रनिंग एका आठवड्यानंतर दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ ती संपली. मिलिंदने याआधी रनच्या संदर्भात निवेदनात म्हटले होते, “एकता, शांतता आणि सौहार्दाचा संदेश देणार्‍या युनिटी रन माध्यमातून आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याचा दुसरा कोणताच चांगला मार्ग नाहीये.

Read Also : साडेसाती आहे तर शनि आमवस्य़ेला शनिदेवाला करा प्रसन्न

युनिटी रन 2022 ही प्रगतीशील भारताच्या 75 वर्षांची आणि तसेच लोकांच्या, संस्कृतीच्या आणि कर्तृत्वाच्या गौरवशाली इतिहासाला देण्यात आलेली श्रद्धांजली आहे.” 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला मिलिंदने मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. तसेच त्याने म्युझिक व्हिडीओजमध्ये देखील भूमिका केल्या, अलिशा चिनाईच्या मेड इन इंडिया अल्बममध्येही तो दिसला होता. मिलिंदने 16 डिसेंबर, रुल्स, भेजा फ्राय आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकताच प्रदर्शित झालेली वेबसीरिज मसाबा, मसाबा 2 मध्ये त्याने एक कॅमिओ केलाय.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी